पाय मुरगळल्यावर करण्याचे घरगुती उपचार

पाय मुरगळणं ही खूप सामान्य अशी समस्या आहे. पण पाय मुरगळल्यावर मात्र ते सामान्य वाटत नाही कारण हे दुखणं असह्य असंच असतं.

पाय मुरगळतो तेव्हा हाडांना जोडणारे लिगमेंट्स डॅमेज होतात. ही समस्या साधारण असली तरी याकडे दुर्लक्ष केले तर त्रास वाढू शकतो.

सहसा व्यायाम करताना काही चूक, एखादी छोटी मोठी दुर्घटना किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

बरेचदा काही खेळताना, जिना चढता-उतरताना आपल्याला काही जाणवत सुद्धा नाही पण नंतर दुखणं सुरू झाल्यावर आपल्याला पाय मुरगळल्याचं जाणवतं.

पण हे दुखणं जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडचं असतं तेव्हा अगदी लगेच डॉक्टर ना दाखवावं.

पण मुरगळणं जर सौम्य प्रमाणात असेल तर घरातच काही काळजी घेऊन दुखणं थांबवता येऊन झालेली दुखापत लवकर बरी करता येऊ शकते…

पाय मुरगळल्यावर डॉक्टरां कडून सुध्दा घरातच काळजी घेण्याची एक पद्धत सांगितली जाते.

ती म्हणजे RICE… थांबा हं… RICE म्हणजे तांदूळ बांधून दुखऱ्या जागेवर लावायचे असं काही नाही…

तर ‘RICE’ म्हणजे Rest, Ice, Compression आणि Elevation

१) Rest- आराम: पाय मुरगळल्यावर मुरगळलेल्या भागाला आराम देणं, हा दुखापत भरून काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय.

२) Ice – बर्फाने पाय शेकवणे: पाय मुरगळल्या नंतर त्या ठिकाणी बर्फाने शेक दिला तर सूज कमी व्हायला मद्त होते. एका कपड़ामध्ये बर्फ बांधून दर 1-2 तासांनंतर शेक देत रहावा. एका वेळी सलग १० ते १५ मिनिट शेक दिला जाणं गरजेचं आहे.

३) Compression – दुखऱ्या जागेवर बँडेज बांधणे: सूज कमी करण्यासाठी दुखऱ्या जागेवर इलॅस्टिक बँडेज बांधावे.

४) Elevation – पाय मुरगळला असता तो उंच भागावर असेल अशा प्रकारे झोपावे. बसलेले असताना पाय उंचावर राहील अशा प्रकारे फुटरेस्ट किंवा स्टुलवर उशी ठेऊन त्यावर ठेवावा.

घरात काळजी घेण्या बरोबरच अशा वेळी आधी काही घरगुती उपाय सुद्धा करता येतात.

१) मोहरीच्या तेलाचा उपयोग: पाय मुरगळला असेल आणि त्याबरोबर खरचटले जरी असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता.

एका पळी मध्ये ५-६ चमचे मोहरीचे तेल आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि लसणाच्या पाच- सहा पाकळ्यांची पेस्ट घेऊन हे मिश्रण १० ते १५ मिनिटे मंद आचेवर गरम करावे. आणि थंड झाल्यावर याने मसाज करावी.

मोहरीचे तेल आणि हळद यांचा अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटी-फंगल गुण घाव आणि सूज दोनीही साठी उपयोगी ठरतो.

२) सैंधव: सैंधव मिठात असलेले मॅग्नेशियम सल्फेट स्नायूंच्या दुखण्यात प्रभावी ठरते.

एक टब भर असलेल्या गरम पाण्यात कप भर सैंधव मीठ टाकून या पाण्यात अर्धा तास मुरगळलेला दुखरा पाय बुडवून ठेवल्यास दुखण्या पासून आराम मिळतो.

यानंतर पाय कोरडा करून त्यावर इलॅस्टिक बँडेज बांधावे.

मुरगळलेला पाय पूर्ण बरा होई पर्यंत रोज दिवसातून एकदा तरी सैंधव मिठाचा असा शेक दिला गेला पाहिजे.

३) एरंडोल चे तेल: एरंडोल च्या तेलात असलेल्या ट्राय ग्लिसरॉइड आणि रिसिनोलीक ऍसिड मुळे सूज कमी व्हायला मदत होते.

याचा वापर कसा करावा:

  • कापडाची एरंडोल च्या तेलात बुडवली पट्टी दुखऱ्या भागावर लावून त्यावर एखाद्या प्लास्टिक च्या कागदाने बांधावे.
  • त्यावर १० ते १५ मिनिट गरम शेक द्यावा.
  • आणि नंतर हे पॅक काढून राहिलेल्या तेलाने मॉलिश करावी.

४) लावंगाचे तेल: लवंगाच्या तेलात ऍनास्थेटीक गुण असतात. त्यामुळे हे नैसर्गिक पेन-किलर सूज कमी करून दुखण्यापासून आराम देते.

लावंगाचे दोन-तीन चमचे तेल घेऊन त्याने दुखऱ्या भागावर हलकेच मॉलिश करावी.

५) हळदीचा लेप: हळदीचा लेप सूज आणि वेदना कमी करायला उपयोगी ठरतो.

मुरगळलेला पाय पूर्णपणे बरा होई पर्यंत दिवसातून दोन-तीन वेळा हे करणे फायदेशीर ठरते.

६) अळशीचे तेल: अळशीच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात घालून त्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवल्यास मुरगळलेल्या पायाला आराम मिळतो.

हे उपाय करून दुखऱ्या पायाला आराम दिला तर मुरगळलेल्या पायाचे दुखणे लवकरच थांबते. आणि आपल्या नेहमीच्या दिनचर्येला आपण सुरुवात करू शकतो.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।