भीतीची भावना ही माणसाच्या मनात येणारी सहज भावना आहे, प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीती वाटतेच, पण जेव्हा भीतीचा अतिरेक होतो, त्या भीतीपासून पळ काढण्याची माणसाची प्रवृत्ती होऊन जाते अशा भीतील शास्त्रीय भाषेत फोबिया म्हणतात.
कुणाला उंच डोंगरावरून खाली बघण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची भीती वाटते, तर कुणाला लोकांमध्ये मिसळण्याची भीती वाटते.
अशा प्रकारची कोणतीही भीती तुमच्या मनात असेल तर तो ‘फोबिया’ टाळण्यासाठी तुम्हाला त्या भीतीचा धैर्याने सामना करावा लागतो.
प्रभावीपणे अशी अचानक वाटणारी भीती कशी टाळायची, आपल्या आयुष्यातून ती कायमची हद्दपार कशी करायची? हे नीट समजून घ्या.
भीती कुणाची? कशाला? हे काव्यं म्हणून ठीक आहे हो, पण प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या कारणानं भीती घर करून बसलेली असतेच.
या भीतीला काढून टाकण्यासाठी फोबिया म्हणजे नेमकं काय हे? पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे ना?
फोबिया म्हणजे एखाद्या खऱ्याखुऱ्या किंवा मनात असलेल्या काल्पनिक धोक्याची प्रतिक्रिया आहे.
कामावर जाण्यासाठी तुम्ही रोज गाडी चालवत जाता, मात्र एके दिवशी अचानक तुम्हाला कुठेतरी पळून जावसं वाटतं, हृदयाचे ठोके जलद पडतात, अस्वस्थ वाटतं, तुम्हाला घाम येतो आणि इथं एक भीती आकाराला येत असते.
भीती ही वाईट नाही ती धोक्याची जाणीव झाल्यानंतर शरीरानं दिलेली सहज प्रतिक्रिया आहे.
मात्र ही भीती मनातून ओसंडून वाहायला लागते, प्रमाणाबाहेर असते तेव्हा तुमचं जगणंच मोडून टाकते.
उंचावरून खाली बघितल्यानंतर तुमच्या पोटात भीतीचा गोळा आला तर तुम्हाला कदाचित उंचीचा फोबिया जडू शकतो.
एखाद्या कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांचे पटकन ग्रुप तयार होतात, त्या ग्रुपमध्ये तुम्ही मिसळू शकत नाही अशा वेळेला तुमच्या मनात एकटा पडण्याची भीती निर्माण होते.
या भीतीमुळं तुमच्या मनात फोबिया कधी तयार झाला हे तुम्हाला कळतही नाही.
कोणतंही वैद्यकीय कारण नसताना मनात भीती निर्माण होते त्यामुळे होतं काय की छातीत दुखतं मळमळतं, चक्कर येते.
ज्या व्यक्तींना आपल्या शारिरीक लक्षणांवर नियंत्रण ठेवता येत नाही त्या व्यक्ती धोक्याच्या पातळीवर जातात.
उंचावरून खाली पडल्यामुळे उंचीची भीती मनात ठाण मांडून बसणं साहाजिकच आहे.
पण ट्रॅफिकची भीती वाटणं, लोकांची भीती वाटणं या मध्ये तसा कोणताही तर्क नसतो.
तरीही बऱ्याच व्यक्ती अशा फोबीयाला बळी पडून स्वतःला घरात कोंडून घेतात.
भीतीवर मात करण्याचे अनेक पर्याय आहेत सगळ्यात प्रभावी पद्धत जी ओळखली जाते ती आहे, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे.
भीतीतून बाहेर पडण्यासाठी प्रभावी टेक्निक म्हणून वर्तणूक/बिहेवियरल थेरपीचा विचार केला जातो.
एखादी व्यक्ती त्याच्या भावना आणि वागणं बदलण्यासाठी जेव्हा या विचारसरणीचा वापर करते तेव्हा त्या व्यक्तीला सकारात्मक भावना आणि विचारांचा अनुभव घेता येतो.
बऱ्याच व्यक्तींना खूप वेगवेगळ्या गोष्टींचा फोबिया असतो.
फोबिया म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीला एखाद्या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया.
थोडक्यात त्या परिस्थितीचा विचार करून सुद्धा भीती वाटणं, असं म्हणता येईल.
एखाद्या व्यक्तीचे कुटुंबीय मित्र किंवा सहवासातील व्यक्ती यामुळे सुद्धा एखाद्याच्या मनात फोबिया नकळत तयार होऊ शकतो.
पण त्या व्यक्तीमध्ये भीती जशी वाढत जाते तसतशी त्या व्यक्तीच्या वागण्यातली सहजता हरवते आणि त्याच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं.
एखादी व्यक्ती भीती निर्माण करणारी परिस्थिती कशी टाळता येईल? याचाच विचार करते.
गंमत म्हणजे काही वेळा त्या परिस्थितीचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध येणार ही नसतो.
फोबिया पासून ज्या व्यक्तीला कायमचं मुक्त व्हायचं, आहे तिनं हे लक्षात घ्यायला हवं की भीती बद्दल अजिबात काळजी करायची नाही.
या भीतीपासून मुक्तता मिळणार आहे यावर विश्वास ठेवून तुमचा दृष्टिकोन आणि प्रतिक्रिया बदलण्यावर लक्ष केंद्रित करा.
भीती ही एक भावना आहे.
बाकीच्या भावनांवर जर आपण सरावानं नियंत्रण ठेवू शकतो तर भीतीवरही नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे.
भीती ही तुमच्या मानसिक रचनेचा एक भाग आहे. त्यावर मात कशी करता येऊ शकेल यावर विचार करा.
एखाद्या भांडकुदळ व्यक्तीशी वाद घालायचा नाही हे तुम्ही जसं मनात ठरवून ते प्रत्यक्षात करू शकता तसेच फोबीयाची भीती टाळायला शिकू शकता.
भीती हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
ख-या भीतीचा सामना करावा लागला तर त्या भितीमुळे तुमची प्रगती होऊ शकते, पण ज्या भीतीवर नियंत्रण ठेवता येत नाही ती भीती वाईटच.
भीतीचं व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्या एखाद्या कौशल्याचा ही आधार घ्या.
एखादी कला जोपासा, छंद निवडा आणि त्या छंदात रमा तरच तुम्ही आनंदी निरोगी आयुष्य जगू शकाल
फोबीयातून बाहेर पडायला डॉक्टरांची, कौन्सिलरची मदत घ्या.
त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या फेजमधून बाहेर पडाल.
डॉक्टर किंवा कौन्सिलर तुम्हाला फोबीयाचे प्रकार ओळखायला सगळ्यात पहिल्यांदा मदत करतील आणि मग हा फोबिया कमी करायला कोणतं पाऊल उचलायचं हे समजावून देईल.
त्यातून तुमच्या मनावर येणारा ताण आणि भीती कमी करायला औषध उपचारांची ही कदाचित मदत लागेल, मात्र यामुळे तुमच्या जीवनात पसरलेला अंधार लवकर दूर होईल.
तुमच्या फोबियावर मात करण्यासाठी, विचारसरणीमध्ये बद्दल करण्यासाठी तुम्ही घरातही काही गोष्टी आवर्जून करू शकता.
विचारांची दिशा बदलणं, हा भीतीपासून मुक्त होण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.
“लोक काय म्हणतील ?”हा विचार सगळेच करतात, पण “लोकांनी काहीही म्हटलं तरी आपल्याला काय फरक पडणार आहे?” असा विचार करायला शिका.
“विचार बदला नशीब बदलेल” हे उगीचच म्हटलेलं नाही.
तुमच्या फोबिया ला उत्तेजन देणारी कारणं लक्षात घ्या.
एकदा का तुम्हाला नेमकं कारण कळलं की ते दूर कसं करता येईल यावर विचार करा.
अंधाराची भीती वाटत असेल तर टू वे स्विच वापरता येतील, मोबाईल फ्लॅशलाईट चा वापर करता येईल.
उंचीची भीती असेल तर सपाट ठिकाणी फिरायला जा….
काचेवरती धूळ असल्यावर पलीकडचं अंधुक दिसतं, काचही गचाळ दिसते.
तसंच फोबिया तुमच्या आयुष्यातला आनंद अंधुक करतात.
ती काच तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी लख्ख पुसून टाका आणि आयुष्याचा भरभरून उपभोग घ्या.
आयुष्य निडर होऊन जगा.
तुमच्या मनातल्या भीतीवर तुम्ही कशी मात केली, आमच्याशी कमेंट मध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
धकाधकीच्या जीवनात अनेक लोक या आजाराचे शिकार होत आहेत, अशा सर्व लोकांना अतिशय उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद!