तो आहे तिकडे कुठेतरी, आपल्याकडे बघतो आहे पण त्याचं अस्तित्व सध्यातरी आपल्याला अज्ञात आहे.
तो सापडेल तेव्हा सापडेल, पण तो अस्तित्वात आहे, तो म्हणजे प्लॅनेट नाईन.
बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून ह्या आठ ग्रहानंतर नववा ग्रह अस्तित्वात असला पाहिजे अस अनेक शास्त्रज्ञ म्हणत आहेत. नासा च्या नवीन संशोधनाप्रमाणे ह्या प्लानेट नाईन शिवाय सौरमाला अस्तितवात असण तस कठीण आहे. नासा च्या मते हा प्लॅनेट नाईन पृथ्वीपेक्षा १० पट मोठा आणि नेपच्यून पेक्षा २० पट सूर्यापासून लांब असण्याची शक्यता आहे. ह्याचा सूर्याभोवती प्रदक्षिणा कालावधी जवळपास १५,००० पृथ्वी च्या वर्षान इतका आहे.
प्लानेट नाईन का? आणि कसा? ह्याच्या शोधासाठी आपल्याला थोड नेपच्यून च्या पलीकडे जाव लागेल. नेपच्यून ग्रहानंतर आपल्या सौरमालेतील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांना ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट असं म्हंटल जातं. नेपच्यून ग्रह हा साधारण ३० अस्ट्रोनोमिकल युनिट अंतरावर आहे. (१ अस्ट्रोनोमिकल युनिट म्हणजे पृथ्वी ते सूर्य ह्यामधील अंतर साधारण १५० मिलियन किलोमीटर). आत्ता पर्यंत १२ असे छोटे ग्रह शोधले गेले आहेत. प्लुटो हा शोधला गेलेला पहिला असा ग्रह ज्याचा शोध १९३० साली लागला. ह्या शिवाय २३०० पेक्षा जास्त ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट जे आकाराने खूप कमी आहेत त्यांचा शोध लागून त्यातील २४२ ग्रहांची कक्षा हि माहिती करून त्यांना ग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. ह्या पलीकडे त्या पोकळीत क्यूपर बेल्ट, ओर्ट क्लाउड, स्कॅटर्ड डिस्क ह्यांनी जागा व्यापली आहे.
क्यूपर बेल्ट हि आपल्या सौरमालेच्या बाहेर गोलाकार डिस्क असून ती नेपच्यून च्या कक्षेपासून म्हणजे ३० ए.यु. पासून ५० ए.यु. पर्यंत पसरलेला आहे. ह्यात अनेक लहान ओब्जेकट्स असून आपली सौरमाला तयार होणाच्या वेळी हा बेल्ट अस्तितवात आला आहे. संशोधक बॅटिजीन आणि मायकल ब्रावून ह्यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनात दाखवून दिल आहे कि कश्या तऱ्हेने सहा ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट च्या कक्षा ह्या प्लानेट नाईन वर आधारित आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार ह्या ऑब्जेक्ट च्या कक्षा ह्या ३० अंशात एकाच ठिकाणी कललेल्या आहेत. हा कोन सौरमालेतील फिरणाऱ्या नऊ ग्रहांच्या कक्षेशी निगडीत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण प्लॅनेट नाईन नाहीच, असा समज केला तर ह्या ग्रहांच्या कक्षा तसेच इतर अनेक अनुत्तरीत प्रश्नांना आपण काहीच उत्तर देऊ नाही शकत. पण जर आपण प्लॅनेट नाईनचं अस्तित्व मानल तर मात्र ह्या ६ ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट सकट इतर अनेक प्रश्नांची उत्तर आपल्या समोर उलगडली जातात. गणित आणि विज्ञानातून आपण त्यांच्या कक्षा आणि त्याचं परिवलन हे सप्रमाण मांडू शकतो.
इतर ताऱ्यां भोवती जे ग्रह सामान्यतः सापडतात त्यात सुपर अर्थ ग्रह असतात. ज्या ग्रहांच वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त पण आपल्या सौरमालेत असलेल्या आईस जायंट युरेनस, नेपच्यून पेक्षा कमी असते अश्या ग्रहांना सुपर अर्थ अस म्हणतात. तर आपल्या सौर मालेत असा एखादा ग्रह सुपर अर्थ असू शकेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार प्लॅनेट नाईन कदाचित आपल्या सौरमालेचा सुपर अर्थ असू शकतो. पुढे जाऊन ह्या प्लॅनेट नाईन च्या शोधासाठी संशोधक आणि वैज्ञानिक सुबारू टेलिस्कोप हवाई चा वापर करणार आहेत. त्यांना यश मिळेल तेव्हा मिळेल. पण नासा च्या मते प्लॅनेट नाईन चा शोध आपल्या सोबत अनेक प्रश्नांची उकल करणारा ठरेल ह्यात शंका नाही.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.