वेळ वाईट असेल तर त्याला न घाबरता आपल्यातल्या सवयींचं एकदा ऍनालिसिस करून घ्या. असमाधानी दुःखी राहून तुमचंच स्वाथ्य खराब होऊन परिस्थिती आणखी बिघडेल हे लक्षात घ्या आणि तुमच्यात या वाईट सवयी असतील तर त्या वेळीच दूर फेका.
आणि हो लक्षात घ्या हे काही फक्त आनंदी राहण्याचं मृगजळ नाही!! निन्जा टेक्निक आहे बरंका😜
आपण नेहेमी खुश, हॅप्पी गो लकी असावे असे कुणाला नाही वाटत. तुम्ही पाहिलंच असेल असे लोक त्यांचं ऑफिस असो, मित्र असो की कुटुंब असो सगळीकडे अगदी राज करतात. या लोकांना आनंदी राहायला कारणच लागत नाही. यांचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो.
ऑफिसमध्ये असतील तर आपल्या बॉसच्या मर्जीत ते असतात. विद्यार्थी दशेत असताना शिक्षकांचे, प्रोफेसर्सचे आवडते स्टुडन्ट म्हणून ते आपले हट्ट सुद्धा पुरवून घेतात. आणि या लोकांच्या तरुणपणी, इतकंच काय कुठल्याही वयात त्यांच्यावर क्रश असणारे सुद्धा कमी नसतात.
असंच व्हायला तुम्हाला पण आवडेल ना!! आणि म्हणून या लेखात मी तुम्हाला दुःखी आणि असमाधानी लोकांच्या सहा वाईट सवयी सांगणार आहे.
या सवयी आपल्यात असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि त्या सवयींवर आपल्याकडे ‘मनाचेTalks’ मध्ये जर काही लेख असेल तर त्याची लिंक सुद्धा इथे देऊ. फक्त सर्व सवयी नीट लक्षपूर्वक वाचा.
यावरूनच एक गोष्ट सांगायचीय. ‘मनाचेTalks’ वर बरेचदा असे सवयींवर किंवा स्वतःला स्वतःचे निरीक्षण करायला लावणारे लेख लिहिलेले असतात.
साहजिकच आमचे असे म्हणणे नाही कि आम्ही काही मानसोपचार तज्ञ आहोत.
पण एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ञाने असूयेने म्हणा कि रागाने म्हणा ‘मनाचेTalks’ आनंदी असण्याचे मृगजळ निर्माण करून मुद्दामहून शास्त्रीय आधार नसलेले लिखाण करते आणि या गोष्टीच लोक आवडीने वाचतात.
अशा आशयाची खोचक टिप्पणी एवढ्यातच केली. (यावर आम्ही डॉक्टरांना, आमच्या वाचकांना तुमचे शास्त्रीय लिखाण वाचायला नक्की आवडेल असे सांगून लिहिण्यासाठी आमंत्रितही केले.)
याबद्दल एक सविस्तर लेख आपण पुढे लिहूच. पण आता सध्या एवढेच सांगायचे कि चांगल्या गोष्टी कितपत घ्यायच्या आणि का घ्यायच्या हे वाचकांना माहित आहे म्हणूनच ते वाचतात.
यामध्ये चुकीच्या गोष्टी आम्ही कुठेच पसरवत नाही. बरं आता विषयावर येऊ 😅
सगळ्यांच्याच आयुष्यात चढ उतार येतात. कधी तुम्ही खूप आनंदात असतात तर कधी खूप दुःखात. काही लोक जवळ सगळे काही असून सुद्धा सुखी असल्याचं समाधान त्यांच्यात नसतं.
तर काही लोक प्रतिकूल परिस्थिती मजेत राहतात. “कभी हसते हैं, कभी रोते हैं…..” असं म्हणत जिंदादिलीने जगता आलं तर मात्र सगळं सोप्प होऊन जातं.
तुमच्यात असतील तर सोडाव्यात अशा दुःखी, असमाधानी लोकांच्या सहा वाईट सवयी
१) तक्रारी करणे – आनंदी राहणारे आणि यशस्वी लोक हे कधीही तक्रारी करण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत नाहीत. (कोर्टात एखादी तक्रार करणं वेगळं. यशस्वी लोक ते करतात🤩) याउलट काही लोक आयुष्याबद्दल नेहमी असमाधानी राहून काहीना काही तक्रार करतात.
एकतर आपल्याला असलेल्या नोकरीत ते खुश नसतात किंवा आपल्या लाईफ पार्टनरबद्दल सतत काहीनाकाही तक्रारी असतात.
सतत आनंदी जर राहायचं असेल ना तर हि सवय मुळापासून उखडून फेका. जर कुठली गोष्ट मनासारखी होत नसेल तर त्याच्यासाठी दुसऱ्याला किंवा परिस्थितीला दोषी समजून मोकळे होऊ नका.
आपली चूक मान्य करून जवाबदारी घ्यायला शिका. प्रत्येक यशस्वी माणसाच्या यशाचं गुपित हेच असतं.
जर एखाद्या गोष्टीच्या पूर्ण न होण्यामागचं कारण तर तुम्ही स्वतः असाल तर स्वतःवर राग धरता का तुम्ही? नाही ना!!
जर घरात तुमच्या हातून ग्लास फुटला तर तुम्ही काय करता?? काही नाही. शांतपणे फुटलेल्या काचेचे तुकडे उचलता ना!!
तसंच चूक मान्य करून जवाबदारी घेतली तर चिडचिड, दुःख, असमाधान यापैकी काहीही तुमच्यावर कब्जा करणार नाही. म्हणून आजपासून आनंदी राहण्यासाठी तक्रारी करणे सोडा.
२) गंभीर असणे – आनंदी राहायचं असेल तर आपल्यातला गंभीरपणा म्हणजे आपली गंभीर असण्याची प्रवृत्ती जरा कमी करता आली तर तो प्रयत्न करा.
तसं पाहिलं तर हा प्रत्येकाच्या स्वभावाचा पॅटर्न असतो. गंभीर असणारी प्रत्येक व्यक्ती नाखूष असते असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण तुमच्यात चैतन्य जर असेल स्वतःच काय आसपासचा परिसर सुद्धा तुमच्या नुसत्या असण्याने टवटवीत होतो.
तर तुमचा गंभीरपणा हा तुमच्या स्वभावाचा भाग असला तरी त्याला तुमची सवय बनू देऊ नका.
३) नेहेमी शॉर्टकट्स शोधण्याच्या प्रयत्नात असणे – अयशस्वी आणि असमाधानी लोक हे नेहमी आपले काम मेहनतीने मन लावून करण्या ऐवजी शॉर्टकट्स शोधत असतात.
असे करून हे लोक नावापुरते आपले काम पूर्ण करून तर घेतात. पण त्यामागे मेहनीतीने केलेल्या कामाबद्दल जी आत्मीयता आणि समाधान असते ते कधीच नसते.
आणि अशा प्रकारे शॉर्टकट शोधून उरकल्या कामाबद्दल तुम्ही ना प्रशंसा मिळवू शकत ना त्याबद्दल तुमची काही बांधिलकी म्हणचे अटॅचमेंट असते. आणि त्यामुळे आनंद आणि समाधान हे तर कोसो दूर असतात.
४) कसलाही अतिरेक – आयुष्यात प्रत्येक गोष्ट हि प्रमाणात असली पाहिजे. आपलं जीवनमान चांगलं असावं हे योग्य पण आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च करून फक्त दिखावा करण्यासाठी अति प्रमाणात खर्च करत गेल्याने आर्थिक अडचण हे बरेचदा काळज्यांच मुख्य कारण असतं.
अतिरेक कुठलाही असो नशेचा असो कि दुसरा कुठला असो त्याने कधीतरी तुम्ही ट्रॅपमध्ये अडकू शकता. म्हणून कसलाही अतिरेक हा वाईटच!!
५) झालेल्या गोष्टींची खंत करत राहणे – बऱ्याच लोकांना भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल दुःख करण्याची, हळहळत राहण्याची एवढंच नाही तर अगदी पश्चात्ताप करण्याची सुद्धा सवय असते.
घडलेल्या गोष्टींचा पश्चात्ताप करणं हे तुम्हाला विनाशाकडे नेऊ शकतं. त्यामुळे पश्चात्ताप करण्यापेक्षा सारासार बुद्धीने विचार करून आपल्या लक्ष्याकडे पोहोचणं हे जमलं तर आपल्यातलं चांगलं व्हर्जन शोधल्याचा जो काही आनंद तुम्हाला मिळेल तो औरच असेल.
पश्चात्तापाला सामोरं जाण्यासाठी हे चार उपाय करून बघा.
१) चुकांपासुन शिका पण त्यात गुंतून बसू नका.
२) पश्चात्ताप ज्या गोष्टीचा होतो आहे ती जर बदलता येत नसेल, त्यात काही सुधारणा करून तुमच्या हाती काही लागणार नसेल तर तो विषय समजदारीने सोडून द्या.
३) चुकांच्या जवाबदाऱ्या घ्या पण प्रत्येक चुकीचं खापर स्वतःच्या माथी फोडू नका.
४) परिस्थितीचा पॉझिटिव्ह विचार करून त्यामुळे नकळत झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या गोष्टींचा चांगल्या गोष्टींवर फोकस करा.
६) भविष्याची काळजी करणं सोडून द्या – असमाधानी असलेल्या लोकांची सर्वात वाईट सवय हि असते कि ते नेहमी भविष्याचा विचार करून चिंतांचं ओझं वाहत असतात.
बरेचदा चिंता अगदी सध्या सध्या सुद्धा असतात पण त्यामुळे असमाधानी राहण्याची जी सवय जडून जाते. ती आपली पकड अशी घट्ट करते कि थोड्या थोड्या कारणाने दुःखी होणे हा तुमचा स्वभावच बनून जातो.
माझी मुलगी बारावीला आहे मग तिला चांगले मार्क मिळून मेडिकलला ऍडमिशन तर मिळेल ना?… मी प्रमोशनसाठी धडपड तर करतोय पण वेळेवर माझ्याकडून काही हुकून तर नाही जाणार ना…
चिंता करणं हे याच सोल्युशन नाही तर मेहेनत करणं हा या परिस्थितीचा मार्ग आहे. मेहनतीने तुमच्यात वाढलेला कॉन्फिडन्स तुमची सगळी मरगळ दूर पळवेल.
आयुष्यात चांगले वाईट सगळेच दिवस पाहावे लागतात. आता वेळ वाईट असेल तर न घाबरता स्वतःलाच सांगा “हर कुत्ते के दिन आते हैं…” वेळ वाईट असेल तर त्याला न घाबरता आपल्यातल्या सवयींचं एकदा ऍनालिसिस करून घ्या.
असमाधानी दुःखी राहून तुमचंच स्वाथ्य खराब होऊन परिस्थिती आणखी बिघडेल हे लक्षात घ्या आणि तुमच्यात या वाईट सवयी असतील तर त्या वेळीच दूर फेका. आणि हो लक्षात घ्या हे काही फक्त आनंदी राहण्याचं मृगजळ नाही!! निन्जा टेक्निक आहे बरंका😜
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice stories for self improvements.