आकर्षणाचा नियम काम करावा यासाठी जगण्याचं सुत्र!

मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुठल्या ना कुठल्या चिंता सतावत आहेत…

  • कुणाजवळ हवा तेवढा पैसा नाहीये, त्यांना आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या भविष्याची चिंता सतावतेय.
  • कुणाला आपल्या व्यवसायात पाहीजे तेवढं उत्पन्न कमवता येत नाहीये.
  • कुणाला कर्ज झाले आहे, तर कोणाजवळ स्वतःच्या मालकीचे घर नाही.
  • कूणाचं वय वाढत आहे, आणि लग्न होत नाही याचे ‘टेंशन’ आहे, तसंच योग्य स्थळ मिळेल का नाही, याचीही चिंता आतुन मनाला पोखरत आहे.
  • कोणाला आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपला विवाह होईल की नाही, याची रुखरुख लागुन राहीली आहे.
  • कुणाला आरोग्याचा कसला ना कसला प्रॉब्लेम सतावतोय, कुणाचा प्रॉब्लेम आहे नातेसंबंधांचा!
  • कूणाला अभ्यासाचा आणि करीअरचा प्रश्न आहे,
  • कोणाला मनमोकळी, पाहीजे तशी, ‘मुक्त लाईफ’ जगता येत नाही याची खंत आहे!
  • कोणी नवरा-बायको दिवसरात्र कचाकचा भांडणं करुन, एकमेकांना नकोसे झालेयत!
  • कुणाच्या आयुष्यात या व्यतिरीक्त अजुनही बरेचशे प्रॉब्लेम्स असु शकतील.

मित्रांनो, अशा चिंतांचे गाठोडे घेऊन आपण स्वप्नपुर्तीच्या दिशेने, आकर्षणाच्या प्रवासाला खुप महत्वकांक्षेने आणि जबरदस्त उत्साहाने जरी निघालो तरी तो अपेक्षित परिणाम आपल्याला मिळेल का?

आकर्षणाच्या नियमाची पहीली बेसीक अट म्हणजे आकर्षण तेव्हाच सुरु घेईल, जेव्हा तुम्ही दिवसातला बहुतांश वेळ प्रसन्न, सतत आनंदी, चिंतामुक्त आणि हलकं फुलकं असलं पाहीजे.

मग एवढे सगळे प्रॉब्लेम घेऊन, डोक्यात भरुन, जगात वावरणारी व्यक्ती कशीकाय आनंदी राहुल शकेल ? त्यासाठी काय काय उपाय आहेत?

  • सुर्योदय किंवा सुर्यास्ताच्या प्रसन्न वातावरणात घराबाहेर पडा, ताजी हवा, आनंदी मनमोहक वातावरण तुम्हाला सारी दुःख विसरण्यास भाग पाडेल.
  • जिथं तुमचं मन शांत राहील अशी कुठलीही एक जागा शोधा, एखादं गार्डन, एखादा हिरवागार पार्क, एखादं शांत आणि प्रसन्न मंदीर, एखादं जलाशय, तलाव, यापैकी कुठेही रोज थोडा वेळ घालवण्याचा, तिथले पॉझीटीव्ह व्हायब्रेशन्स अनुभवण्याचा प्रयत्न करा.
  • काहीच शक्य नसल्यास आपल्या घराचा टेरेस आपली हक्काची मनशांतीची जागा, सावलीत खुर्ची टाकुन एकटे बसा.
  • तरुण-तरुणींसाठी व्यायाम एकदम हुकुमी एक्का आहे, तुम्हाला जितका राग येतोय, त्याच्या दुप्पट त्वेषाने व्यायाम करा, सगळी उर्जा बाहेर काढा, अक्षरशः शरीर ठणकेपर्यंत व्यायाम करा, करुन बघा!, सारा राग, चिंता, दुःखे तास-दोन तासात ‘मिस्टर इंडीया’ सारखे गायब होतील. मन शांत होईल. जे जमतं ते करा, सुर्यनमस्कार करा, योगासने करा, प्राणायाम करा, सुदर्शनक्रिया करा, सायकलिंग करा, स्विमींग करा, क्रिकेट, बॅडमिंटन खेळा, रनिंग, वॉकिंग काहीही करा.
  • बस्स… एक तासभर शारीरीक हालचाल झाली पाहीजे आणि श्वासांचा वेग वाढला पाहीजे, अशी कोणतीही कृती तुमचा स्ट्रेस घालवेल.
  • थकलेल्या शरीराला ध्यानात नेणं, खुप सोपं असतं. तिथं अदभुत मानसिक शांतीचा अनुभव येतो.
  • बोलताना दक्ष रहा, प्रॉब्लेम्सची चर्चा रिपीट-रिपीट अनावश्यकपणे करुन नका. हे एवढं पथ्य मी सांगतो म्हणुन पाळाच.
  • इतरांशी बोलताना किंवा मनातल्या मनात एखादी वाईट घटना, दुःखदायक प्रसंग ह्यांची उजळणी अजिबात करायची नाही.

आज मी तुम्हाला अजुन एक इंट्रेस्टींग गोष्ट सांगणार आहे.

मित्रांनो, असं समजा, एक जंगल आहे, त्यात आपल्या मालकीची एक नयमरम्य जागा आहे, आपली एक सुंदर झोपडी आहे. जंगला मध्ये हिंस्त्र प्राणी आहेत, जसं की वाघ, सिंह, बिबट्या. ते आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणुन आपण एक कुंपण घालतो.

  • जंगलात प्राणी धुमाकूळ घालतील तेव्हा आपण काही करु शकत नाही, कारण ते आपल्या आवाक्याच्या बाहेर असतं! आपल्याला तेथील लोकांची काळजी वाटते पण आपलं तिथं नियंत्रण नसतं.
  • पण आपल्या कुंपणा्ची वेस ओलांडुन आत कोणी रानटी प्राणी आलाच, तर आपण हातावर हात ठेवुन बसु का? आपण तात्काळ हत्यारं घेऊन त्याला ठार मारु किंवा पळवुन लावु. आपल्या प्लॉटमध्ये काय करायचं, सामना कसा करायचा, हत्यारं किंवा पिंजरे कसे ठेवायचे, ह्यावर आपलं नियंत्रण असतं!

या गोष्टीतले, हे दोन क्षेत्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात…

१) एक असतं, चिंतेचं क्षेत्र! ह्याला म्हणतात, Area of concern! इथे आपण फक्त सुस्कारे सोडत चिंता करु शकतो, पण आपण परिस्थीतीचं नियंत्रण करु शकत नाही, जसं की,

  • पेट्रोल डिझेलचे भाव खुप वाढायलेत, बाबा!
  • चिमुरड्यांवर अत्याचार होत आहेत, माणुसकी संपत चाललीये,
  • सरकार, प्रशासन सगळे सगळे आमच्या जातीवर, आमच्या धर्मावर अन्याय करायलेत,
  • वरचेवर उन किती वाढायलयं! पाऊस कमी पडायलाय.
  • जीएस्टीमुळे धंदे करणं लई अवघड झालयं, मार्केट थंड आहे, एटीएमला कॅश नाही,
  • मला लग्नाला मुलगी मिळना झालीय, ज्यांच्या लग्नाच्या मुली आहेत ते सगळे माजलेत साले!
  • माझ्या गर्लफ्रेंडशी माझं लग्न होवु शकलं नाही,
  • मुलांचे शिक्षणाचे खर्च कसले वाढलेत, काही खरं नाही रे बाबा!
  • माझे वडील बिजनेसला पैसे देत नाहीत,
  • समाज लई स्वार्थी झालाय, कलियुग आलयं!
  • सरकार लुटायला बसलयं! नुसते टॅक्स लावयलेय, जगावं कसं तेच कळेना!
  • चायना धमक्या देऊ लागलाय, पाकीस्तान आपल्या सैनिकांना मारु लागलाय!
  • रशिया अमेरीकेमध्ये अणुयुद्ध होणारे! जग नष्ट होणारे!

इत्यादी इत्यादी, असा कुठलाही प्रॉब्लेम आपण ज्याचं वाकडं करु शकत नाही, तो म्हणजे चिंतेचं क्षेत्र!……

हे जेवढं जास्त तेवढं, तुमच्या आयुष्यात, तेवढा जास्त मानसिक त्रास!…… हे जेवढं कमी, तेवढे तुम्ही अधिक सुखी!

२) दुसरं असतं प्रभावाचं क्षेत्र – जिथं आपलं नियंत्रण असतं, ते क्षेत्र,  मी काय करू शकतो, म्हणजे माझा प्रभाव!

  • मी नवीन स्किल शिकुन माझं उत्पन्न वाढवु शकतो,
  • माझ्या व्यवसायात मी ग्राहकसंख्या वाढवु शकतो, व्यवसायातल्या नफ्याचं उत्पन्न वाढवु शकतो, आणि माझी कमाई वाढवु शकतो.
  • मी आजुबाजुच्या लोकांशी अजुन जास्त प्रेमानं बोलणं, वागणं, वाढवुन त्यांची मने जिंकु शकतो.
  • मला ज्यांची चिंता वाटते, त्यांच्यासाठी मी काही कृती करु शकतो, त्यांची सेवा करु शकतो.
  • मी स्वतःचा आत्मविश्वास वाढवुन माझं व्यक्तीमत्व अजुन आकर्षक बनवु शकतो, आणि जे इतरांना मदत करु शकतो.
  • पुस्तकं वाचुन, व्हिडीओ बघुन मी माझं ज्ञान वाढवु शकतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलु शकतो.
  • व्यायाम आणि ध्यान करुन स्वतःच्या शरीराला आणि मनाला मजबुत बनवु शकतो.
  • माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी माझे कामाचे तास वाढवु शकतो.
  • जीवनात आनंद मिळावा म्हणुन मी मनाला आनंद देणारे छंद जोपासु शकतो.
  • निखळ मैत्री आणि प्रेमळ नातेसंबंध मला जगण्याला अजुन आनंद देतील.

इतर गोष्टी असो वा नसो, ह्या आणि अशा साऱ्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत……त्यांच्यावर मी नक्कीच प्रभाव टाकु शकतो.

तर असं काहीस आहे जगण्याचं सुत्र….

प्रभावाचं क्षेत्र जेवढं अधिक तेवढं आयुष्य आधिक आनंदी, उत्साही!…… चिंतेच क्षेत्र जितकं मोठ्ठं तितका जास्त तणाव, अस्वस्थता!

प्रभावाचं क्षेत्र > चिंतेचं क्षेत्र = मानसिक आनंद, स्वप्नपुर्तीकडे वाटचाल!

चिंतेचं क्षेत्र > प्रभावाचं क्षेत्र = दुःख, चिंता, मानसिक ताण, स्वप्नापासुन दुर दुर जाणं!

निवड तुमची आहे, मला माहीतीये, तुम्ही योग्य आयुष्याची निवड कराल.

धन्यवाद!….

मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:

वाचनकट्टा...
वाचनकट्टा… नानाविध पुस्तकांचा…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “आकर्षणाचा नियम काम करावा यासाठी जगण्याचं सुत्र!”

    • सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.

      धन्यवाद.

      Reply
  1. कोर्सच्या माहितीसाठी ९८२२३९९६८० या व्हाट्स ऍप्प नम्बरवर ‘LOA UPDATES ‘ असा मेसेज पाठवा. नवीन batch सुरु होताना तुम्हाला माहिती दिली जाईल.

    धन्यवाद.

    Reply
  2. तुमचे लेख खूप छान आहेत.motivational कोर्से करायचा आहे.या कोर्सेचे स्थळ कुठे आहे.आणि फी किती आहे.

    Reply
  3. सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.

    धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।