“थॉम्स” मला लिझा प्रेमानी थॉम्स म्हणते, आजची सकाळ खूपच ग्लूमी आणि बर्फाळ वाटत होती, मी लवकरच बेडवरुन उठलो आणि पोर्च मध्ये आलो, आमच्या बंगल्यातून छान दृश्य दिसायचं, म्हणजे गावाबाहेर होता आमचा बंगला.
मी लिझा आणि आमची छोटुकली एली, मस्त जीवन होतं एकंदरीत, लिझा अजूनही लोळत पडली होती बेडमध्ये, रात्री जरा जास्तच वाईन घेतली असावी तिने, खूप अवखळ झाली होती रात्रभर झोपू दिलं नाही लिझाने मला, एका फर्म मध्ये मी उच्चपदावर काम करत असल्याने पैसा बक्कळ येत होता घरात कसलीही कमतरता नव्हती…. मी बसलो गार्डन मध्ये, सकाळी सिगरेट ओढलेली लिझा ला आवडायची नाही, ती झोपली होती म्हणून चान्स घेतला, मस्त दोन झुरके मारल्यावर छान वाटलं, रिलॅक्स वाटलं एकदम.
लिझा ला उठवावं??….. मी हाक मारायला सुरवात केली, तिला आवडायचं नाही मोठ्यांनी हाका मारलेल्या, लिझा ….. लिझा …. शर्मिला….. शर्मिला…
ओ… ओ…. आले आले किती ओरडताय, देते चहा जरा धीर धरा, राणीला दूध देते आणि देते चहा तुम्हाला, आज कसली घाई इतकी?….. मी शांत पणे पेपर चाळत राहिलो…. दोन मिनटात शर्मिला आली आणि माझ्यासमोर कप धरला घ्या किती घाई तुम्हाला?
ही लिझा म्हणजे ना महाराणी आहे अगदी, किती हाका मारल्या तरी उठायचं नाव नाही, अहो कसला कोणाचा विचार करताय ?
थॉम्स आज तुला जायचं नाहीये का?
कंटाळा आलाय…. वातावरण बघ किती थंड आणि ग्लुमी झालंय आराम करावासा वाटतोय नुसता….. तुझ्या मिठीत दिवसभर पडून रहावंस वाटतंय……
अहो श्रीधरराव ठीक आहात ना? चहा थंड होतोय, तो घ्या आधी, शर्मिला आज मेनू काय आहे ग? आधी चहा तर घ्या, नुसते खाण्याचे विचार सदोदि….
लिझा डिअर कम लेट्स एन्जॉय, थॉम्स लाडात येऊ नकोस हां, एलीच्या शाळेत पेरेंट्स टॉक्स आहेत, मला जायचं आहे एलीबरोबर, सोड मला…..
अहो महाशय कसली स्वप्नं बघताय?
शर्मिला…. शर्मिला, माझं आंघोळीचं पाणी काढतेस का?
ही विनन्ती आहे का? का ऑर्डर? राणी ची वेणी घालतये मग काढते पाणी जरा वाचत बसा पेपर,
लिझा…. व्हाट्स फॉर ब्रेकफास्ट? आय मेड क्रॅम्बल्ड एग्स फॉर यु डिअर…….
ग्रेट!!!
हे घ्या पोहे तुमचे आवडते…..
लिझा…. तुला येतात का ग पोहे बनवता? लिझा माझ्याकडे वेड्यासारखी बघत राहिली…..
पोहे? ती गोंधळली? म्हणजे काय ? मी सुद्धा अचंबित झालो मी लिझा ला हे पोहे का काय ते करायला का सांगितलं असाव? व्हाट्स धीस पोहे ?
शर्मिला….. यु लुक ग्रेट इन वन पीस, लुक्स सेक्सी…..
अहो राणी आहे इकडे सांभाळा आपल्या भावनांना…. हाहाहा मीच माझ्याशी हसलो…..
काय हो तब्येत ठीक आहे ना?
लिझा, माझी तब्येत बरी आहे…..
थॉम्स यु आर टॉकिंग इर्रिलेव्हंट, व्हॉट हॅपन्ड टू यु?
शर्मिला…. लिझा आहे का घरात, जरा बोलवतेस, एली हाका मारत्ये तिला, राणी इकडे ये….. लिझ, राणीला स्कुलबस ला सोडशील का ?
दोघीही माझ्याकडे बघायला लागल्या कावऱ्याबावऱ्या होऊन…… लिझ आणि शर्मिला, मी खुर्चीवर पेपर वाचत होतो, मलाच समजत नव्हतं काय चाललंय ते?
वाचण्यासारखे आणखी काही….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.