Psycho- मारली त्याने खाली उडी….

अचानक तो स्वयंपाकघरातून धावत आला आणि माझ्यासमोरून म्हणजे मी हॉल मध्ये बसलो होतो…… माझ्यासमोरून माझ्याकडे तिरक्या नजरेनी बघत धावत गॅलरीत गेला आणि…… आणि झोकून दिल शरीर बाहेर गॅलरीच्या दहाव्यामाळ्यावरून…… बाप रे पापणी लवण्याचा क्षणही झाला नाही ह्या सर्व घटनेत आणि मी दचकलो एकदम भानावर आलो….. घामानी थबथबलो….. छाती भरल्यासारखी वाटायला लागली…….

मी कसाबसा उठून गॅलरीत आलो, खाली कसली तरी गडबड जाणवली पण वरच्या माळ्यावरून समजत नव्हती, मला धक्काच बसला होता त्यातून अजून सावरलो नव्हतो, मी वॉचमन ला फोन केला, कूच नाही साब, चोर को पकडा है पब्लिकने, मी परत घरात आलो स्वयंपाक घरात गेलो. काहीच आढळलं नाही, कोण धावत गेलं हे सुद्धा समजलं नाही, मी जणू जाणीवच हरपून बसलो होतो, बेडरूम मध्ये जाऊन पडलो, कधी झोप लागली समजलंच नाही, संध्याकाळचे चार वाजले होते, मेन दरवाजाचा आवाज आला, ही आली बहुतेक, मी कधी झोपत नाही सहसा दुपारी, त्यामुळे ती आश्चर्य व्यक्त करतच बेडरूम मध्ये आली, काय हो तब्येत बरी आहे ना?

मी काहीच बोललॊ नाही, आरशात नजर टाकली आणि मी दचकलोच परत एकदा, एकदम उतरला होता चेहरा,उ तरणारच दुपारच्या त्या दृश्याचा परिणाम, हिला मी काहीच सांगितलं नाही, रविवार असल्याने तिचं महिला मंडळ असतं कुठे ना कुठे तरी, मी आजच्या प्रसंगी धसकलोच होतो, चहा घेऊन मी खाली आलो, आमच्या फ्लॅटच्या खाली सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये, मला काहीच दिसलं नाही असं काही म्हणजे तो धावत गेलेला तरुण माझ्यासमोरून आणि गॅलरीतून… भास होता का? क्या हुआ था दोपेरको?कूच नाही साब, चोर था, म्हणजे नक्कीच भास….

आठवडा कसा गेला समजलाच नाही, दोन दिवस आम्ही बाहेर जाऊन आलो जरा चेंज, रविवारी सकाळी हिची घाई, महिला मंडळाची, सर्व सूचना सुरु होत्या सकाळपासून, धावाधाव नुसती, दहा साडेदहाला गेली, मी शांतपणे हॉल मध्ये पेपर वाचत बसलो, चैनच पडेना, जेऊन घेतलं आणि परत हॉल मध्ये येऊन बसलो, बारा साडेबारची वेळ झाली, मला डोळ्यावर जरा झापड आली होती, मी स्वयंपाकघरात फेऱ्या मारत होतो अधून मधून, शांताता करकरीत दुपारची, सोसायटीत सुद्धा शांतात वाटत होती, आमच्या मजल्यावर पाच फ्लॅट्स पण चार जण गायब रविवारच्या कार्यक्रमांमुळे, कदाचित मी एकटाच अख्या मजल्यावर, गॅलरीत जाऊन आलो, मागच्या रविवारचा प्रसंग आठवला, मान झटकली, भासच तो, मागे वळून हॉल मध्ये यायला पाऊल उचललं आणि……..

तो तरुण धावत आला माझ्या अंगावरून माझ्याकडे तिरक्या नजरेनी बघत गॅलरीत गेला आणि झोकून दिलं शरीर बाहेर, मी थिजलो जागेवरंच, मला त्याची बाजूनी जाण्याची जाणीव झाली जणू, स्पर्श झाल्यासारखे वाटले, त्याच्या तिरक्या नजरेत काय भाव होते कोणास ठाऊक, मी मटकन जमिनीवरच बसलो, भिंतीला पाठ टेकली, मला झोप कधी लागली हे समजलच नाही…….

मागचीच पुनुरावृत्ती, मी तिकडेच, चार वाजता दार वाजले, ही आत आली, मला अश्या अवस्थेत पाहून हबकलीच, काय हो काय झालं? घाबरली, मला उठवलं बेडवर झोपवलं, पाणी दिलं ,चहा केला आणि म्हणाली काय झालंय तुम्हाला ? लेकीला फोन केला…. ती पण येते म्हणाली.

माझी नजर स्वयंपाकघरकडे. या हो इकडे आत मध्ये…… मी मनातून हबकलो. आत मध्ये जायचं धाडस नव्हतं. गॅलरीत जायचं धाडस नव्हतं. तो सारखं डोळ्यासमोर येत होता आणि त्याची तिरकी नजर……. ही खोदून विचारत होती माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता….. काय सांगणार?

मला रविवारची भीती आणि आतुरता दोन्ही वाटायला लागली हल्ली…… म्हणजे चार रविवार सेम घटना, सेम टाइम, सेम तरुण…… तेच तेच…..

मला राहवलं नाही ह्या रविवारी हिला सांगितलं जाऊ नकोस…… ती वेळ झाली परत मी बसलो हॉल मध्ये. हिला पण संगितलं बस म्हणून. हिला जरा आश्चर्यच वाटलं. टाइम झाला…… मी स्वयंपाकघरकडे बघयला लागलो. काय बघताय?? हिला गोंधळ्यासारखं झालं होत, बारा वाजून गेले आणि एकदम तो आला धावत…… अगं, हा बघ बघ…… ही पटकन उठली, बघ कसा पळतोय…… आता उडी मारेल बघ गॅलरीतून, दर रविवारी हेच करतो तो. पकड त्याला…..

अहो… अहो….. ही मला सावरत होती कदाचित, मला काहीच समजत नव्हतं, मी गॅलरीत एक पाय रेलिंगवर टाकून उभा होतो आणि हिने गच्च धरून ठेवलं होत मला त्यांनी मारली बघ उडी, अहो भानावर या असं काय करताय? ही घाबरून किंचाळायला लागली, खालच्या माळ्यावरचे लोक वर आले दार ठोठवायला लागले. पाच मिनटात घटना संपली. मी गॅलरीत बसलो रेलिंग गच्च पकडून बाजूला ही मला मिठी मारून…… मी भानावर आलो हळू हळू….. हिने दार उघडलं. लोक आत आले, काय झालं…… कुजबुज…. विचारणा …. गेले सर्व अहो काय होतंय तुम्हाला?

अगं तो तरुण, कोण ? कोणी नव्हतं, मग मला दिसतो दर रविवारी दुपारी स्वयंपाकघरातून येतो आणि उडी मारतो गॅलरीतून खाली…… ही खूप धसकली….. अहो असं काही नाही हो….. कोणी नाही तरुण वगैरे….. अहो तुम्हीच धावत होतात स्वयंपाकघरात गेलात पाणी प्यायला आणि धावत आलात बाहेर हॉल मध्ये आणि धावत गेलात गॅलरीत माझ्याकडे तिरक्या नजरेनी बघत…… अहो काय झालंय तुम्हाला???

एकटेपणाचं प्रेशर आलंय, सांभाळा, त्यांना ऐकट सोडू नका……

हल्ली ही मला सोडून कुठे जात नाही……. गॅलरीला कोलॅप्सिब्ल डोअर लावलाय…..सारखं बंद असत ते…… दुपारच्या गोळ्या घेऊन झोपतो हल्ली…. भास कमी झाल्येत कदाचित.

काल रात्री कसली तरी चाहूल लागली. मी हॉल मध्ये गेलो. बघितलं तर धक्काच बसला. तो तरुण चाव्या लावून गॅलरीचं कोलॅप्सिबल डोअरचं लॉक उघडायचा प्रयत्न करत होता आणि माझ्याकडे तिरक्या नजरेनी बघत होता…

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।