कॉँग्रेसचे लोकप्रिय नेते श्री.राहुल गांधी ह्यांनी नुकतीच वयाची ५१ वर्षे पूर्ण केली.
नेहरू, गांधी परिवाराची चौथी पिढी असलेले राहुल आता राजकारणात असले तरी त्यांचे बालपण मात्र राजकारणापासून दूर होते.
बालपण सार्वजनिक जीवनापासून अलिप्त
१९ जून १९७० रोजी राजीव आणि सोनिया गांधी ह्यांच्या पोटी दिल्ली येथे राहुल यांचा जन्म झाला. राहूल हे त्यांच्या आई वडिलांचे पहिले अपत्य आहेत. त्यांचे बालपण मुख्यत्वे दिल्ली आणि डेहराडून येथे गेले.
त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. काही काळानंतर त्यांचे वडील श्री. राजीव गांधी हे पंतप्रधान झाले.
परंतु इतक्या प्रसिद्ध परिवाराचा भाग असूनही त्यांच्या कुटुंबाने त्यांना प्रसिद्धीपासून लांब ठेवले.
१९८१ ते १९८३ ते डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये शिकले. परंतु १९८४ मध्ये त्यांच्या आजी इंदिरा गांधी ह्यांची हत्या झाल्यामुळे त्यांचा परिवार हादरून गेला. सुरक्षेच्या कारणांमुळे राहुल आणि त्यांची बहीण प्रियंका ह्यांचे शाळेसाठी बाहेर पडणे बंद करून त्यांना घरीच शिक्षण घ्यावे लागले. १९८९ पर्यन्त त्यांनी घरीच शिक्षण घेतले.
१९८९ मध्ये राहुल ह्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. त्यांना स्पोर्ट्स कोट्यामधून ऍडमिशन मिळाली.
In 1989,National Rifle Association Of India Certified Rahul Gandhi is Position Holder in 25 Mtr.Centre Fire Pistol @ National Shooting Champ pic.twitter.com/BvwbDnudQx
— 𝐒𝐚𝐮𝐫𝐚𝐛𝐡 𝐑𝐚𝐢 सौरभ राय 🇮🇳 (@SaurabhRaii_) October 26, 2017
राहुल यांनी जापनीज मार्शल आर्ट Aikido मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेला असून ते नॅशनल शूटिंग चॅम्पियन सुध्दा होते.
What happened when @boxervijender met CVP Rahul Gandhi?
Watch the tête-à-tête here! #RahulMeansBusiness pic.twitter.com/80XP942HOL— Congress (@INCIndia) October 26, 2017
त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ‘हार्वर्ड युनिवर्सिटीमध्ये’ प्रवेश घेतला.
परंतु १९९१ मध्ये त्यांचे वडील श्री.राजीव गांधी ह्यांची हत्या झाली. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना त्यांचे कॉलेज बदलावे लागले.
मग त्यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमधून १९९४ मध्ये B.A. ची पदवी घेतली.
नाव बदलावे लागले
१९९५ मध्ये राहुल ह्यांनी केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये एम. फील. करण्यासाठी प्रवेश घेतला. परंतु आपली ओळख लपवण्यासाठी त्यांना त्यांचे नाव ‘सु राहुल विन्सी’ असे ठेवावे लागले.
राजीव ह्यांच्या हत्येनंतर त्यांचा संपूर्ण परिवार सतत असुरक्षित वातावरणात होता आणि सुरक्षेच्या कारणासाठी राहुल आणि त्यांच्या बहिणीला सतत ओळख लपवावी लागत असे.
शिक्षण पूर्ण होताच काम सुरु केले
शिक्षण पूर्ण झाल्यावर राहुल ह्यांनी लंडन येथे ३ वर्षे ‘मॉनिटर ग्रुप’ नावाच्या फर्ममध्ये सल्लागार म्हणून काम केले.
त्यानंतर २००२ मध्ये मुंबईतील एका टेक्निकल फर्म बॅकोप्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये देखील त्यांनी विश्वस्त मंडळावर काम केले.
२००४ मध्ये राजकारणात प्रवेश
नेहरू गांधी घराण्याचे वारस असल्यामुळे राहुल ह्यांना राजकारणासंबंधी प्रश्न वारंवार विचारले जात. तसेच त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल खूप चर्चा होत असे.
राहुल ह्यांनी २००४ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अमेठी येथून निवडणुकीसाठी उभे राहिले. तेव्हापासून ते कॉंग्रेसचे नेतृत्व करत आहेत.
लहानपणापासून आजी आणि वडिलांची हत्या, सततचे भीतीचे वातावरण, वारंवार शाळा, कॉलेज बदलणे ह्या गोष्टी सहन कराव्या लागल्या असूनही राहुल ह्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व झाकोळू दिले नाही.
एक उमदे राजकारणी म्हणून ते सतत कार्यरत आहेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.