सध्या कोविड पाठोपाठ महाराष्ट्रात थैमान घातले आहे ते पावसाने.
मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे.
कोकणपट्टा, रत्नागिरी, चिपळूण तसेच कोल्हापूर, सांगली आणि इतरही काही गावे अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत.
महाबळेश्वरच्या दिशेचा रस्ता खचून वाहतूक करणे अशक्य झाले आहे. कोकणातील नद्यांवरचे अनेक पूल वाहून गेले आहेत.
मुंबईत पाणी साठून रस्ते बंद होणे, रेल्वे ठप्प होणे हे तर अगदी नेहमीचे झाले आहे.
अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे भयावह विडिओ समोर येत आहेत.
तसेच अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेलेली घरे, जनावरे ह्यांचे हृदयद्रावक फोटो आणि विडिओ समोर येत आहेत.
प्रचंड पाऊस पडून सगळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढताना दिसत आहेत.
भारतात इतरही ठिकाणी असे अनुभव येत आहेत. हिमाचल प्रदेशा, उत्तराखंड ह्या प्रदेशात दरडी कोसळणे, हिमालयातून बर्फाच्या दरडी कोसळून खाली येणे, तेथील नद्यांना महाभयंकर पुर येणे अशा घटना घडत आहेत.
२५ जुलैला भूस्खलन होऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या नऊ टूरिस्ट्सचा दुर्दैवी अंत निसर्गाच्याच कुशीत झालेली घटना तर हृदय पिळवटून टाकणारी आहे.
#WATCH | Himachal Pradesh: Boulders roll downhill due to landslide in Kinnaur district resulting in bridge collapse; vehicles damaged pic.twitter.com/AfBvRgSxn0
— ANI (@ANI) July 25, 2021
मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? ह्या घटना अचानक का वाढत आहेत?
दरवर्षी असा पाऊस येऊन दरडी कोसळणे, जीवित हानी होणे ह्या गोष्टी गेल्या काही वर्षातच का वाढत आहेत? ह्याला जबाबदार कोण?
आपलेच वागणे तर ह्याला जबाबदार नाही ना?
गेल्या काही वर्षात आपल्या राज्यात किंवा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होत आहे.
जमिनीची धूप होत आहे. उंच कडे किंवा टेकड्या भुसभुशीत होत आहेत. त्यामुळे तेथील जमीन खचून दरडी कोसळत आहेत.
ह्याचे प्रमुख कारण हे की सर्वत्र झाडांची बेसुमार कत्तल होत आहे, सर्वत्र कॉँक्रीटचे जंगल उभे रहात आहे. पाण्यात भराव टाकून इमारती उभ्या केल्या जात आहेत.
केवळ शहरातच नव्हे तर गावांमध्येही हल्ली अशी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमुळे पावसाचे चक्र बिघडून कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस असे घडत आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत.
अलीकडच्या काळातच ह्या सर्व घटना वाढीस लागल्या आहेत. ह्यामुळे होणारी जीवितहानी, सांपत्तीक हानी ह्याला जबाबदार कोण? निसर्गाचा हा होणारा ऱ्हास आपण कसा थांबवणार? येणाऱ्या पिढ्यांसाठी नैसर्गिक साधन कशी सुरक्षित ठेवणार?
मित्रांनो, तुमची ह्याबाबतीतली मते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
तुमचे वेगवेगळे अनुभव सांगा. ह्यावर आपण काय उपाय करू शकतो हेही सांगा.
आपण सर्व मिळून आपल्या निसर्गाचा समतोल साधायचा प्रयत्न करू. चला तर मग, लिहिते व्हा, होउद्या चर्चा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.