हवामान बदलामुळे आजारी फिल करताय का?
तुमच्या सॉक्स मध्ये रात्री झोपताना कांदा ठेवा, हा उपाय नक्की ट्राय करा
कांदा घातल्याशिवाय पोहे आणि भजी यांचा विचारच करता येत नाही राव, जेवताना बुक्कीनं फोडून खाल्लेल्या कांद्याची सर हॉटेलमधल्या नाजूक कापलेल्या कांद्याला येत नाही.
भाजीत कांदा नसेल तर कित्येकांना भाजी बेचव लागते आणि कांदा लसूण मसाला या शिवाय स्वयंपाक ही व्यर्थ वाटतो.
नॉनव्हेज बरोबर कांदा नसेल तर कसली मजा?
बघा नुस्त कांद्याचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटलं आणि किती पदार्थ आठवायला लागले.
पण मित्रांनो पदार्थांना चविष्ट करण्याशिवायही कांद्याचे कितीतरी उपयोग आहेत, तुम्हांला माहिती आहेत का?
नाही? नो प्रॉब्लेम ! चला आज आपण कांद्याचे आणखी काही फायदे समजून घेऊया.
खमंग आणि चविष्ट पदार्थातून पोटात उडी मारणारा हा कांदा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुमचं आरोग्य सुधारू शकतो.
त्यासाठी काय करायचं तर रात्री झोपताना सॉक्स मध्ये कांदा घालून ठेवायचा त्यामुळे काय होईल? चला पाहूया.
1) जिवाणूंचा नायनाट
मानवी पायामध्ये सात हजारांहून अधिक नसा असतात असं विज्ञानानंही सिद्ध केलेलं आहे.
विशेष म्हणजे या सगळ्यां नसा संपूर्ण शरीराच्या संपर्कात असतात.
म्हणूनच तुम्ही रोज रात्री झोपताना पायाखाली कांदा ठेवून सॉक्स घातले तर प्रचंड फायदे तुम्हाला जाणवतील.
पहिल्यांदा कांदा तुमचं शरीर स्वच्छ करेल. तुमच्या शरीरात असणारे बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे जंतू यांना खेचून काढेल.
पायाची त्वचा ही पातळ असते त्यातून बॅक्टेरिया आणि रसायने लवकर शोषली जातात.
तर हा कांदा तुमचं शरीर लख्खं आणि स्वच्छ करू शकतो आणि हो, तेही तुम्ही निवांत स्वप्नात तरंगत असताना कुठलाही कष्टाशिवाय.
2) सर्दी पडसं
पडशापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही एकदा तरी सॉक्स मध्ये कांदा ठेवून पहाच.
सर्दी-पडसे लवकर कमी झाल्याचा अनुभव तुम्हांला आल्यावाचून राहणार नाही.
पण मित्रांनो हा उपाय करण्यासाठी जे कांदे तुम्ही वापराल ते सेंद्रिय असतील याची खात्री करून घ्या.
रासायनिक खतावर तयार झालेल्या कांद्याचा तुमच्या आरोग्यावर अजिबात प्रभाव पडणार नाही.
शरीरशुद्धीसाठी कांदा प्रभावी.
चीनच्या औषधात कांद्याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो.
जगभरातल्या नामवंत डॉक्टरांनी कांद्याचे फायदे मान्य केलेले आहेत.
सर्दी, युरिन इन्फेक्शन, कान दुखी, दात दुखी, अशा अनेक विकारांवर कांद्याचा उपयोग होतो.
यासाठी फार काही प्रक्रिया वगैरे करायची आहे का? तर तीही नाही!
फक्त एक कांदा घ्या, अर्धा कापा. पायाच्या तळव्याखाली बोटांच्या बाजूला हा कांदा ठेवून वरून सॉक्स घाला.
रात्रभर तसंच ठेवा सकाळी उठून पाय हलकेच स्क्रबरनं घासून घ्या.
कांद्याचे चांगले उपयोग तुम्हाला लवकरच जाणवायला लागतील.
मित्रांनो कुठलाही उपाय हा क्षणार्धात फरक दाखवत नाही.
पण तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी जागरूक असाल, थोड्याशा हवामान बदलामुळे आजारी पडत असाल तर रात्री झोपताना सॉक्समध्ये कांदे घालण्याचा उपाय नक्की करून बघा, आणि हो तुमचे अनुभव आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Reaction hot nahi ka