#MeToo चं वादळ काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीये. मागील महिन्यात मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी #MeToo वर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. आलोक नाथवर केल्या गेलेल्या आरोपांच्या बाबतीत त्यांनी लेखिका आणि दिग्दर्शिका विनता नंदा यांचे समर्थन केले आहे. आलोकनाथ यांच्याबरोबर काही सिनेमांमध्ये काम केलेले असून आलोकनाथ यांना आपण ओळखत असल्याचेहि त्या सांगतात.
I remember you sharing this with me many many years ago. Brave of you to come out & talk about this harassment. You, @sandymridul & @vintananda My heart goes out to you brave women ❤🙏 https://t.co/3EG2lKoBDa
— Renuka Shahane (@renukash) October 10, 2018
यावेळी रेणुका शहाणे त्यांच्याबरोबर काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग सांगतात. त्या म्हणाल्या “मी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शूटिंग संपल्यावर मी पुन्हा हॉटेलमध्ये आले. बराच उशीर झाला होता शुटिंगमुळे जेवण राहीलं. मी हॉटेलच्या रूमवर गेल्यावर तिथून फोने करून ऑर्डर मागवली. थोड्याच वेळात एक वेटर जेवण घेऊन आला, मी त्याला जेवण टेबलावर ठेवायला सांगून बाहेर जायला सांगितलं.
तो वेटर जेवण ठेऊन तसाच उभा राहिला, मी त्याला जायला सांगितलं तर तो मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मी किती सुंदर दिसते ह्याचं कौतुक करू लागला. अचानक त्याचं वागणं बदललं आणि तो माझ्या समोर हस्तमैथुन करू लागला. मी चिडले आणि त्याच्यावर ओरडले आणि इथून त्वरित निघून जायला जांगितले. तो वेटर घाबरला आणि रूम बाहेर गेला. मीही रूम बाहेर गेले आणि थेट मॅनेजरला भेटले. मॅनेजरला घडलेला सगळा प्रसंग सांगितला.
त्या हॉटेल चालकाने त्या वेटरवर काय ऍक्शन घेतली हे मला माहित नाही पण ह्या घटनेमुळे मी कोणत्याही हॉटेलमध्ये कधीही एकटी राहण्यासाठी गेली नाही. आजही मला एकटं हॉटेलात राहायला खूप भीती वाटते. जेंव्हा तुमच्यावर असे काही प्रसंग घडतात त्याचा तुमच्या आयुष्यावर कायम परिणाम झालेला असतो हे महिला कधीही विसरूच शकत नाहीत.
स्त्रीया काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आता इतक्या उशिराने का बोलू लागल्या यावर समाजाच्या सगळ्याच स्तरावरुन, अगदी राजकारणात स्रियांच्या संरक्षणाचा विडा उचलल्याचे भासवणाऱ्यांनीही एका अर्थाने #MeToo ची खिल्लीच उडवली आहे. यावर रेणुका शहाणे म्हणतात कि हे प्रश्न अत्याचार झालेल्या स्त्रीलाच विचारले जातात हेच आपलं दुर्दैव.
I hope you are asking a few questions to the abusers, molesters & rapists? Or are all your questions reserved for women speaking up? https://t.co/ONbJtLoxyR
— Renuka Shahane (@renukash) October 10, 2018
वाचण्यासारखे आणखी काही…
खगोल / अंतराळ
प्रेरणादायी/MOTIVATIONAL
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.