दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे करण्यासाठी करा हे सोपे उपाय

 

तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर पूर्ण दिवसभराचा तुमचा मूड अवलंबून असतो. शांत आणि प्रसन्न मनाने सकाळी तयार झालात तर रात्रीपर्यंत तुमची मनोवृत्ती सकारात्मक राहते.

याउलट जर दिवस कटकटीने किंवा त्रासिक मूडमध्ये सुरु झाला तर तसेच तापदायक अनुभव येत राहतात.

सकाळचा मूड आणि मनावर होणारा परिणाम यावर संशोधन केले गेले आहे. त्यातून असे दिसते की ज्यांचा मूड सकाळी खराब असतो असे कर्मचारी कंपनीमध्ये पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत.

याउलट सकाळी चांगल्या मूडमध्ये असलेल्या कर्मचारीवर्गामुळे कंपनीला नफा होतो. यावरुन सकाळची वेळ किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आले असेल.

मग या वेळेचा उपयोग आपली मानसिक अवस्था चांगली राखण्यासाठी केला पाहिजे.

सकाळी मन प्रसन्न रहाण्यासाठी हे तीस उपाय करा.

१. वेळेवर उठणे

रात्री लवकर झोपणे व सकाळी वेळेवर उठणे ही सवय आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. यामुळे सकाळी व्यायाम किंवा इतर कामे करण्यासाठी वेळ मिळतो. वेळेवर उठायचे असेल तर फोन उशाशी ठेवू नका.

नाहीतर अलार्म वाजला की तो बंद करून तुम्ही परत झोपी जाल. त्याऐवजी काही अंतरावर फोन ठेवलात तर तुम्हाला अलार्म बंद करण्यासाठी उठावेच लागेल.

२. खिडक्यांचे पडदे उघडा

अंधाऱ्या वातावरणात झोप येते. सकाळची फ्रेश हवा व सूर्यप्रकाश खोलीत आला की ताजेतवाने वाटते. यामुळे बॉडी क्लॉक सुद्धा नियमितपणे काम करते.

३. बिछाना आवरुन ठेवा

अस्ताव्यस्त पसरलेल्या चादरी पाहून आळस येतो. याउलट नीटनेटके आवरलेले अंथरुण पाहून मन उत्साही होते. सकाळच्या वेळी केलेली ही लहानशी कृती खूप महत्त्वाची आहे.

४. स्नान करुन ताजेतवाने व्हा

यामुळे आळस पळून जातो. शरीर आणि मन प्रसन्न होते.

५. आरोग्यवर्धक असे पेय घ्या

कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा स्मूदी प्यायल्याने शरीर फ्रेश होते.

६. कोवळ्या सूर्यप्रकाशात जा

फक्त १० ते १५ मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरलात तरी मोकळी हवा आणि चालण्याचा व्यायाम होतो यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होते.

७. रोजच्या कामांची लिस्ट बनवा

यामुळे तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने काम कराल. कोणती कामं अर्जंट आहेत ते समजेल. वेळ वाया जाणार नाही.

८. चांगले संगीत ऐका

संगीतामुळे मन प्रसन्न होते. एकाग्रता वाढते. मूड चांगला रहातो. सकाळची कामं उरकत असताना तुमच्या आवडीचे संगीत ऐका.

९. अर्धा तास न चुकता व्यायाम करा

शारीरिक हालचालींमुळे एनर्जी लेव्हल वाढते. जिम किंवा स्ट्रेचिंग अथवा योगासने करा.

१०. सकाळच्या वेळी आपल्या उद्दिष्टांवर काम करा

या वेळची नैसर्गिक सकारात्मकता तुम्हाला मदत करु शकते. तुम्ही ठरविलेली उद्दिष्टं आणि त्यादृष्टीने करायची तयारी यासाठी हा वेळ खर्च करा.

११. ऑफीससाठी टिफीन तयार करा किंवा आवडत नाश्ता

आपण घरुन निघताना व्यवस्थित नाष्टा केला तरी एकदा कामाच्या ठिकाणी आलो, की काही ना काही खाल्ले जाते. हे टाळायचे असेल तर घरुन फळं किंवा ड्राय फ्रूट चा डबा आणा. म्हणजे जंक फूड टाळणं सोपं जाईल.

१२. घर नीट आवरुन ठेवा

सकाळच्या घाईत जरी ५ ते ७ मिनिटे आवराआवर केली तरी त्याचा परिणाम म्हणून मूड प्रसन्न होतो.

१३. ध्यान करणे

ध्यानाचे अगणित फायदे आहेत. पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत रहाते. म्हणून दररोज सकाळी किमान दहा मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे.

१४. स्ट्रेचिंग करणे

शरीर ताणले जाईल असे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. स्नायू कार्यक्षम रहातात. दिवसभर एकाच जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींना सकाळी असे व्यायाम केल्याने खूप रिलॅक्स वाटते.

१५. सुविचार वाचणे

एखाद्या प्रेरणादायी वाक्याने दिवसाची सुरुवात केली तर मन उत्साही रहाते.

१६. एक ग्लास पाणी प्या

शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळाले तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. अन्यथा टेन्शन, चक्कर असे त्रास संभवतात. नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स केले जाते.

१७. काहीतरी नवीन रचनात्मक कार्य करा

कविता, लिखाण, पेंटिंग किंवा पुष्परचना करणे असे कोणतेही मनाला आनंद देणारे, तुम्हाला आवडणारे काम करा. यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जातो.

१८. कृतज्ञता यादी बनवा

ज्या गोष्टींकरीता तुम्हाला आयुष्याला धन्यवाद द्यावेसे वाटतात त्यांची यादी बनवा. यात आरोग्य, नाती, नोकरी हे सर्व असू शकते. कोणतीही गोष्ट गृहीत धरणे फार सोपे आहे पण जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे ही खूपच प्रभावी गोष्ट आहे.

१९. पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवा

निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे प्राण्यांपासून शिकता येते. शिवाय यामुळे स्ट्रेस कमी होतो.

२०. प्रेरणादायक पॉडकास्ट ऐका

काम करता करता तुम्ही एखादा सकारात्मक पॉडकास्ट ऐकू शकता. बिझनेस, आरोग्य, उद्योजकता अशा विषयांवर आधारित प्रेरणा देणारे काहीतरी रोज सकाळी ऐकले तर दिवस आनंदात जातो.

२१. कामाचे नियोजन करा

संपूर्ण दिवसभर करायची कामे, मिटिंग्ज, अपॉइंटमेंट यांची लिस्ट तयार करा. या कामांचा नीट क्रम लावा. सकाळीच अशी तयारी केली की दिवसभरात एकामागोमाग एक कामं उरकता येतात. वेळ फुकट जात नाही.

२२. दररोज काहीतरी नवीन शिका

रोज सकाळी काहीतरी मेंदू फ्रेश ठेवणारे काम करावे. एखादी नवीन भाषा शिकणे, वाद्य, संगीत किंवा खेळ यामुळे मन ॲक्टीव्ह मोड वर रहाते.

२३. सकाळची शांत वेळ एन्जॉय करा.

घरातील सर्व माणसे उठण्यापूर्वी तुम्ही लवकर उठत असाल‌ तर सकाळच्या शांत आणि पवित्र वातावरणात थोडा वेळ शांत बसा. यामुळे एक वेगळीच एनर्जी अनुभवता येईल.

२४. दिवसभरात कोणाला मदत करता येईल याचा विचार करा

आजकाल जगात बहुतेकजण आपल्यापुरते पहातात. सगळीकडे स्वार्थ आणि अहंकार वाढत चालला आहे.अशा वेळी निरपेक्ष भावनेने एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर मनाला खूप समाधान वाटते.

तुम्ही कोणाला अशी लहानशी मदत करु शकता का याचा विचार सकाळच्या वेळी करा.यामुळे मन प्रसन्न होते.

२५. पोहणे

हा सर्वात छान व्यायाम आहे. यामुळे शरीरात हलकेपणा येतो. मानसिक आनंद मिळतो. वजन कमी होते. सांधेदुखी सारखे त्रास कमी होतात.

२६. नाष्टा एकत्र बसून करा

मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सर्वांनी एकत्र नाष्टा केला तर दिवसाची सुरुवात छान होते. एकमेकांशी बोलणे होते. मन हलके होते.

२७. आरशात स्वतःचे निरीक्षण करा

कामावर जाण्यापूर्वी आरशात स्वतःला पहा. तुमचा वेश, मेकअप आणि तुम्ही उत्साही दिसताय का हे चेक करण्याची सवय ठेवा.

२८. स्टिव्ह जॉब्स यांचा उपदेश लक्षात ठेवा

आजचा दिवस हा माझा शेवटचा दिवस आहे. मग त्यानुसार काम मी करतोय का? हा प्रश्न स्वतःला रोज सकाळी विचारा.

जर सतत बरेच दिवस उत्तर “नाही” असे येत असेल तर आयुष्यात बदल करण्याची गरज आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधे दिलेल्या व्याख्यानात हे सांगितले आहे.

२९. कामावर जाण्यासाठी वेळेवर घराबाहेर पडा

प्रवासात अनेक अडचणी येऊ शकतात. ट्रॅफीक किंवा इतर काही कारणांमुळे उशीर झाला तर आपल्याला टेन्शन येते आणि संपूर्ण दिवस खराब होतो. म्हणून भरपूर वेळ हाताशी ठेवा.

३०. घरातून बाहेर पडताना आपल्या जवळच्या व्यक्तींचा निरोप घेऊन मगच बाहेर जा

कामाच्या गडबडीत आपल्या आयुष्यातील महत्त्वाची नाती विसरुन चालणार नाही. रोज सकाळी निघण्यापूर्वी निरोप घेणे ही अगदी छोटी कृती आहे पण त्यामुळे नात्यांची वीण घट्ट होते.

तर अशा आहेत या तीस सवयी ज्यामुळे तुमची सकाळ अगदी प्रसन्न होऊन जाईल. यातील तुम्हाला ज्या शक्य असतील तेवढ्या गोष्टी नक्कीच करुन पहा.

तुमचा मूड आनंदी राहील. आणि दिवसभर तुम्हाला काम करण्याची एनर्जी मिळेल. आपल्या आयुष्यात पूर्वीपेक्षा चांगले बदल होत आहेत हे तुम्हाला समजेल.

यातील सवयी कायमच रुटीन मधे ठेवा आणि मजेत रहा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।