आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे ह्यावर आपण रडत बसणार की जोमाने संकटांचा सामना करणार हे ठरत असते. मान्य आहे, कि या कोविड काळात संकटांची मालिकाच सर्वांसमोर उभी आहे. पण तुमची प्रचंड इच्छाशक्तीच ठरवेल कि तुमचा आजचा दिवस कसा जाईल. आणि जेव्हा समोर धुकं पडल्याने रस्ता दिसत नाही तेव्हा आत्मविश्वासाने चालत राहिलं तर मार्ग नक्की मोकळा होतो. या लेखात आपण सकारात्मक जगण्यासाठी लागणाऱ्या पंधरा सवयी बघणार आहोत.
ह्या सवयी एकदा का तुम्ही आपल्या अंगात भिनवल्या की कुठल्याही संकटाचा अगदी आरामात सामना करू शकाल.. आणि हो लेखाच्या शेवटी दिलेल्या धम्माल प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र विसरू नका!!
आपण आपल्या आसपास अनेक प्रकारची माणसे बघतो. काही माणसं अगदी लहानशा संकटाने, दुःखाने कोलमडून जातात तर काहीजण अगदी मोठ्यातमोठ्या संकटाला धीराने तोंड देऊन त्यातून बाहेर पडतात आणि जोमाने आपलं आयुष्य जगतात.
आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे ह्यावर आपण रडत बसणार की जोमाने संकटांचा सामना करणार हे ठरत असते.
कवी संदीप खरे ह्यांच्या एका कवितेच्या ओळी अशावेळी आठवतात
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो…
तर आज आपण अशाच सकारात्मक जगण्यासाठी लागणाऱ्या पंधरा सवयी बघणार आहोत. ह्या सवयी एकदा का आपण आपल्या अंगात भिनवल्या की आपण कुठल्याही संकटाचा अगदी आरामात सामना करू शकू आणि आपलं आयुष्य मजेत जगू शकू.
१ . दीर्घ मुदतीचे ध्येय ठरवा :
रोजच्या जगण्याच्या गदारोळात बऱ्याचदा आपण इतके अडकून जातो की आपण ही धावपळ का करत आहोत? ह्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे? असले प्रश्नच आपल्या नजरेसमोर येत नाहीत.
ह्यामुळे आपण ओझ्याच्या बैलासारखे खाली मान घालून फक्त काम करायला लागतो. त्यामुळे ना आपल्याला कामाचा आनंद मिळतो ना काम पूर्ण केल्याचे समाधान.
अशावेळी सगळ्यात महत्वाचे आहे आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवणे. रोम एका दिवसात बांधून झाले नव्हते असे म्हणतात त्याचप्रमाणे आपल्याला हवे ते अगदी लगेच मिळणे अशक्य असते पण आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे हे एकदा मनाशी पक्के केले की आपण एक एक पाउल त्या दिशेने टाकू शकतो.
आपले रोजचे कंटाळवाणे काम हे आपल्या आयुष्याच्या ध्येयाच्या दिशेने पडणारे एक पाउल आहे हे लक्षात आल्यावर आपल्याला त्या कामात उत्साह वाटायला लागतो आणि आपल्या जगण्यात एक प्रकारची सकारात्मकता येते.
२. लहान लहान उद्दिष्टे नजरेसमोर ठेवा:
आपण आपले दीर्घकालीन ध्येय ठरवले आणि त्या दृष्टीने वाटचाल करायला सुरवात केली तरी ते गाठायला आपल्याला बराच मोठा काळ लागणार असतो.
एवढा वेळ आपला सुरवातीचा उत्साह टिकून राहणे जवळपास अशक्य असते. यासाठी आपण लहान लहान उद्दिष्टे ठरवणे गरजेचे असते.
उदाहरणार्थ जर आपल्याला तीस किलो वजन कमी करायचे असेल तर ते व्हायला मोठा काळ जाणार असतो ह्यासाठी सुरवातीला आपण पहिल्या आठवड्यात फक्त एक किलो वजन कमी करायचे लहान उद्दिष्ट ठेवावे.
एकदा का आपण ते पूर्ण करू शकलो की त्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला वाटायला लागते की आपली प्रगती योग्य दिशेने सुरु आहे.
असंच हळूहळू करत आपण आपल्या दीर्घकालीन ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो.
३. स्वतःला रिवॉर्ड द्या :
आपण आपली लहान लहान उद्दिष्टे ठरवल्यानंतर करायचे पहिले काम म्हणजे त्या उद्दिष्टांसाठी स्वतःचे कौतुक करा. स्वतःसाठीच काहीतरी करा. स्वतःलाच काहीतरी ट्रीट द्या.
कोणत्याही कामाचा जर मोबदला मिळत असेल तर ते काम करायला आपल्याला जास्त उत्साह वाटतो मग ते काम भले स्वतःचे का असेना.
त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतः ठरवलेले लहान उद्दिष्ट पूर्ण कराल तेव्हा स्वतःलाच एखादे लहानसे बक्षीस देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल तुम्ही पुढच्या उद्दिष्टासाठी किती आतुर होता ते. आणि हि मजा पण काही औरच असेल.
४ . ठरवलेल्या ध्येयाचा पाया भक्कम करा :
आपण आपल्या आयुष्याचे दीर्घकालीन ध्येय ठरवून त्यावर वाटचाल सुद्धा सुरू केली असे समजू. पण कधीकधी अचानक आपला आपल्या ध्येयावरचा विश्वास उडतो आणि आपला प्रवास अडखळतो.
त्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे आपल्या ध्येयावर असलेला विश्वास.
आपण एखादे दीर्घ मुदतीचे ध्येय ठरवताना त्याचा पूर्ण अभ्यास, विचार करणे गरजेचे असते.
हे करण्यामागे काय कारण आहे हे आपल्याला पूर्णपणे माहित असणे गरजेचे असते. जर असे असेल तर कधी आपल्या प्रवासात आपली पावले अडखळली तर आपण आपल्या ध्येयाबद्दल विचार करून, त्यापासून प्रेरणा घेऊन नव्या दमाने आपला प्रवास सुरु करू शकतो.
५. ठरवलेले ध्येय सिक्रेट ठेऊ नका ते जाहीरपणे बोलण्याचा संकोच करू नका:
आपण आपल्या मनात बऱ्याच गोष्टी वेळोवेळी ठरवत असतो आणि त्या पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो.
पण त्या गोष्टी कधी पूर्ण झाल्या नाहीत तर ते कुणालाच समजत नाही. पण आपल्या दीर्घकालीन ध्येयाबद्दल आपण असे करणे बरोबर नाही.
आपल्या दीर्घकालीन ध्येयाबद्दल आपण जाहीरपणे बोलणे गरजेचे असते. आपल्या जवळच्या काही लोकांना तरी आपण त्याबद्दल सांगणे आवश्यक असते.
जर लोकांना ते माहित असेल तर निदान इतरांसमोर स्वतःची किरकिरी होऊ नये म्हणून तरी आपण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावरून विचलित होणार नाही. यशस्वी लोकांची चरित्रे जर तुम्ही वाचली असतील तर त्यांनी त्यांची ध्येये हि नेहमी बोलून दाखवलेली होती हेच दिसेल.
६. ध्येयाने प्रेरित लोकांच्या सानिध्यात राहा :
‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे ती ह्या बाबतीत सुद्धा तेवढीच लागू पडते.
आपल्या आजूबाजूला कसे लोक आहेत ह्यावर आपला प्रवास बऱ्याचवेळा ठरत असतो. सतत आपल्या ध्येयाबद्दल अविश्वास दाखवणारे, त्याची खिल्ली उडवणारे, नकारात्मक लोक आपल्या आजूबाजूला असतील तर काही काळाने आपण सुद्धा आपल्या ध्येयाबद्दल साशंक होऊ शकतो.
त्यामुळे आपल्या आजूबाजूला सकारात्मक लोक असणे फार महत्वाचे असते. आजूबाजूला असणाऱ्या लोकांची सकारात्मकता आपल्याला सुद्धा कायम सकारात्मक ठेवते आणि आपण आपल्या रस्त्यावरून भरकटत नाही.
७. सभोवती हितचिंतकांची फळी निर्माण करा :
आपण आपल्या ध्येयाच्या वाटेवर जात असताना आपली पावले चुकीच्या दिशेने पडू शकतात आणि त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.
ह्या साठी आपल्या सभोवती आपल्या हितचिंतकांची एक फळी असणे फार गरजेचे असते. ह्या फळीत घरचे लोक किंवा जवळचे मित्र असं कुणीही असू शकतं.
हे लोक अशा वेळी आपल्याशी बोलून, आपल्याला सावध करून परत योग्य वाटेवर आणण्याचे काम करू शकतात. ज्या लोकांचे आपण ऐकतो अशी लोक ह्या फळीत असणे महत्वाचे आहे .
८. भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहा :
रोजच्या जगण्यात सकारात्मकता महत्वाची आहे हे जरी खरे असले तरी त्याचबरोबर आपण आपल्या समोर येणाच्या अडथळ्यांचा सुद्धा विचार करणे गरजेचे असते.
आपल्या मार्गात कोणकोणती आव्हाने येतील ह्याचा आपण आधीच अभ्यास करणे गरजेचे असते ज्यामुळे आपण त्याच्यावरचे उपाय सुद्धा शोधून ठेऊ शकतो आणि जेव्हा ती आव्हाने खरोखर आपला रस्ता अडवतील तेव्हा आपण जोमाने त्यांचा सामना करू शकतो.
९. पौष्टिक आहार घेऊन मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घ्या :
आपल्या मनाचे स्वास्थ्य हे बऱ्याच अंशी आपल्या शरीराच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. आपण दिवसभरात कोणत्या प्रकारचे अन्न खातो हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते.
आपल्या जेवणात पौष्टिक पदार्थ असणे फार गरजेचे असते त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते आणि आपले मन प्रसन्न राहते.
शरीर आणि मन दोन्ही निरोगी असल्यामुळे आपण जोमाने आपले काम करू शकतो.
१०. दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक करा :
सकाळचा वेळ हा दिवसाचा सगळ्यात महत्वाचा वेळ असतो. सकाळ जर आळसावलेली गेली तर पूर्ण दिवस तसाच जातो.
सकाळी ज्या गोष्टीने आपल्याला ताजेतवाने वाटते ती गोष्ट करणे गरजेचे असते. मॉर्निंग ला जाऊन सकाळची ताजी हवा दिसभरासाठी तुम्हाला रिचार्ज करायला पुरेशी असते.
११. आरामदायी झोप घ्या :
आपला पूर्ण दिवसाचा उत्साह हा आधीच्या रात्रीच्या झोपेवर अवलंबून असतो. जर आपल्याला रात्री शांत झोप लागली तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ताजेतवाने होऊन उठतो आणि आपला उत्साह पूर्ण दिवस टिकतो.
तेच जर झोप पूर्ण झालेली नसेल तर दिवसभर निरुत्साह, आळस यामुळे कुठल्याच कामात आपले पूर्ण लक्ष लागत नाही.
त्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आधी रात्रभर शांत झोप घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. गोष्ट अगदी साधी असली तरी तुमच्या, जोमाने पुढे जाण्याच्या वाटचालीत खूप महत्त्वाची आहे.
१२. न चुकता व्यायाम करा:
आपले शरीर ताजेतवाने असेल तरच आपले मन ताजे-तावाने राहू शकते. शरीराला निरोगी आणि उत्साही राखण्यासाठी व्यायाम करणे फार महत्वाचे आहे.
चालणे, धावणे, पोहणे किंवा आपल्याला जमेल तो इतर कुठलाही व्यायाम करणे फार महत्वाचे असते.
दररोज न चुकता व्यायाम केल्यामुळे आपण निरोगी राहतो आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पूर्ण उत्साहाने वाटचाल करू शकतो.
१३. स्वतःला ओळखा :
आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल फार विचार करतो. ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून’ असा आपला स्वभाव असतो.
त्यामुळे कोणत्या माणसात काय दोष आहेत हे आपण अगदी बरोबर सांगू शकतो मात्र हाच प्रश्न जर स्वतःबद्दल विचारला तर आपण उत्तर देऊ शकत नाही.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आधी आपण स्वतःचाच अभ्यास करणे गरजेचे असते.
आपण कोण आहोत, आपले गुण कोणते आहेत, आपल्यात कोणते दोष आहेत हे सगळं आपण निःपक्षपातीपणे शोधणे फार महत्वाचे असते.
हे शोधले तरच आपण आपल्या दोषांवर काम करून ते दूर करू शकतो आणि आयुष्यात हवे त्या ठिकाणी पोहोचू शकतो.
१४. भीतीवर ताबा मिळावा :
प्रत्येकाला कसली ना कसली भीती ही असतेच. भीती नसलेला माणूस दुर्मिळच. भीती असणे हे वाईट नाही मात्र त्या भीतीवर काम करून त्यावर विजय मिळवणे सगळ्यात महत्त्वाचे असते.
एकदा का आपल्याला आपल्या भीतीवर मात करता आली की जगातले कोणतेही काम आपण त्या आत्मविश्वासावर पूर्ण करू शकतो.
१५. विजय साजरा करा :
आपल्या ध्येयाचा खडतर मार्ग आपण बराच काळ अविरत चाललो की आपल्याला यश मिळायला लागते.
आपल्या एक एक इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. ह्या साठी आपण फार कष्ट केलेले असतात त्यामुळे हे मिळालेले यश हे खास असते, अशावेळी थोडा वेळ काढून आपण स्वतःचेच कौतुक करणे गरजेचे असते.
इतर कुणी भले नसेल आजूबाजूला पण स्वतःच स्वतःची पाठ थोपटून अभिनंदन करणे गरजेचे असते. त्यामुळे केलेल्या कष्टाचा विसर पडतो आणि नव्या जोमाने आपण परत सुरवात करतो.
बरं आता एक मस्त एक्झरसाईझ करायची?
समजा या वरती दिलेल्या पंधरा सवयी लावून तुम्ही भन्नाट यश मिळवलं, भरपूर पैसा कमवला, फॉरेन टूर्स ला जाणं आवाक्यात आणलं, स्वतःच्या अटींवर जगता येईल असं सगळं मिळवलं तर स्वतःचं अभिनंदन तुम्ही कसं कराल?
तर ह्या आहेत आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या पंधरा सवयी. एकदा का आपण ह्या आपल्या अंगात भिनवल्या की आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहचू शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
I want to join law of attraction course what to do for that
सध्या कोर्स शेड्युल नाही मोफत अपडेट्स साठी तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता.
मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.
https://chat.whatsapp.com/FagqgMvvgAbIjYupwXIpIo
कृपया करून whatsup लिंक पाठवा sir जेणे करून खुप काही शिकायला मिळेल मला thank you sir
मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.
https://chat.whatsapp.com/GUW9IFVeFph0VlNQt1nYha
Khup chan vatal…. Manala navin shikayala bhetale…. Love it
Super..nice articles.. Great