एसबीआय आपल्या खातेधारकांना विनाशुल्क देत आहे दोन लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर, (कोणत्याही प्रीमियम आकारणी शिवाय) – जाणून घ्या कोणाला याचा लाभ होऊ शकतो ?
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या खातेधारकांना विना शुल्क दोन लाख रुपयांचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर देत आहे. नक्की कोणत्या खातेधारकांसाठी ही सुविधा आहे हे आपण आज जाणून घेऊया.
एसबीआयच्या ज्या खातेधारकांनी “प्रधानमंत्री जनधन योजना” या योजनेअंतर्गत खाते उघडले आहे अशा खातेधारकांना हे दोन लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे.
“प्रधानमंत्री जनधन योजना” या योजनेअंतर्गत खाते उघडलेल्या सर्व खातेदारांना जरी हे इन्शुरन्स कव्हर मिळणार असले तरी सध्या २८ ऑगस्ट २०१८ पूर्वी खाते उघडलेल्या खातेधारकांना ही सुविधा मिळणार आहे. हळू हळू टप्प्याटप्प्याने नंतर खाते उघडलेल्या खातेधारकांना देखील ही सुविधा मिळेल.
सध्या २८ ऑगस्ट २०१८ पूर्वी खाते उघडलेल्या खातेधारकांना RuPay कार्ड साठी अप्लाय केल्यावर रु. १ लाख इतका ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर मिळत आहे. तर २८ ऑगस्ट २०१८ नंतर खाते उघडलेल्या आणि RuPay कार्ड साठी अप्लाय केलेल्या सर्व खातेधारकांना रुपये २ लाख इतका ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे.
या इन्शुरन्स साठी एसबीआय कडून कोणताही प्रीमियम आकारला जाणार नाही. हे इन्शुरन्स कव्हर विनामूल्य असेल.
इन्शुरन्स कव्हरचा लाभ नक्की कसा मिळेल?
खातेधारक व्यक्तीचा अपघात होऊन कायमचे परावलंबित्व आल्यास अथवा मृत्यू झाल्यास खातेधारकाने नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले असेल अशी व्यक्ती RuPay कार्डद्वारे इन्शुरन्स क्लेम करू शकते. त्यासाठी अपघात घडल्यानंतर ९० दिवसांच्या आत एक फॉर्म भरून तसेच इतर कागदपत्रे सबमिट करून इन्शुरन्सच्या रकमेसाठी क्लेम करता येते. प्रधानमंत्री जनधन योजना अकाउंट नंबर, त्या खात्याचे पासबुक, नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीची माहिती ही सर्व कागदपत्रे सबमिट करावी लागतात. तसेच झालेल्या अपघाता संबंधी देखील सर्व माहिती द्यावी लागते. त्यानंतर या सर्वांची स्क्रुटीनी होऊन इन्शुरन्सची रक्कम नॉमिनीला दिली जाते.
प्रधानमंत्री जनधन योजना २०१४ मध्ये सुरू केली गेली. २०१४ पासून खाते उघडलेल्या खातेधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व खातेदारांना हा लाभ मिळेल. असा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या एसबीआयच्या शाखेत जाऊन “प्रधानमंत्री जनधन योजना” या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.