गरीब असणे किंवा श्रीमंत असणे हे दोन मनाचे खेळ आहेत.. असे म्हंटले तर पटेल का? कदाचित नाहीच पटणार.
म्हणूनच आपल्या विचारसरणीत समजून उमजून हे बदल आणा म्हणजे समृद्धी तुमच्याकडे चालत येईल.
गरीब असणे किंवा श्रीमंत असणे हे दोन मनाचे खेळ आहेत.. असे म्हंटले तर पटेल का?
आपण स्वतःला कसे प्रोजेक्ट करतो त्यावर आपले यश अवलंबून असते.
आपली वैचारिक कुवत सुद्धा आपल्याला परिस्थितून वर आणते किंवा खाली नेते. आपण म्हणतो हा गरीब माणूस आहे, आणि हा श्रीमंत माणूस.
कारण त्या दोघांमध्ये असलेली पैशांची तफावत आपल्याला असा विचार करण्यास भाग पाडते.
पण श्रीमंत होण्यासाठी त्याच्याकडे नक्कीच काहीतरी विशेष असतं आणि एखाद्याकडे गरिब परिस्थिती असण्याच्या मागे काहीतरी कमी असतं….
नक्कीच परिस्थितीत काही कमी असते. पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहेत अविश्व्सनीय रित्त्या श्रीमंत असलेले कित्येक जण हे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नव्हते.
याला कारण होतं त्यांची मानसिक श्रीमंती. आज या लेखात असेच काही विचारांचे पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे.
तुमच्यात तुमच्या विचारा नुसार काम करण्याची क्षमता निर्माण होते. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार ह्यांच्या कमी जास्त होणाऱ्या प्रमाणात तुमच्या क्षमतेत फरक पडतो असं आपण म्हटलं तर ते योग्य ठरेल खरे तर..
कारण सकारात्मकतेकडे पैसा झेपावतो आणि नकारात्मकतेकडे दारिद्र्य हे आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहून आपल्याला अनुभवता येते.
आता गरीब आणि श्रीमंत ह्यांच्या विचारात काय फरक असतात ते जरा बघू.
इंक डॉट कॉम च्या एका अहवालातून हे समोर आलंय की “पैसा” ह्या एका गोष्टीवरून श्रीमंत आणि गरीब ह्यांचामधलं अंतर विचारांमुळे कमी किंवा जास्त होऊ शकतं.
एखाद्याचा चेहेरा बघून, विचारांची पातळी समजून आपल्याला कळू शकतं की ह्या व्यक्तीकडे श्रीमंत बनण्याची क्षमता आहे किंवा नाही.
फक्त त्याची विचार करण्याची पद्धत हे सगळं सांगते. दोघांच्या विचारात काय फरक असतो ते बघू.
१- गरीब माणूस विचार करतो की मला पैसे कमावण्यासाठी काहीतरी काम करायला पाहिजे. तर श्रीमंत माणसाचा विचार असा असेल कि मला पैशाने स्वतःसाठी काम करवून घ्यायचं आहे.
म्हणजे बघा… इथं गरीब कष्ट करून पैसे मिळवायचा विचार करतोय तर श्रीमंत आहे त्या पैशालाच कामाला लावणार आणि लोकांकडून कामं करून घेणार.
२- सर्व सामान्य लोक असा विचार करतात की जास्त पैसा मिळवला की तो डोक्यात वाईट विचार आणतो आणि माणूस भरकटत जातो त्यापेक्षा पैसा पोटापुरता मिळाला म्हणजे ती काळजी नाही. जास्त पैसा इथं काळजी चा विषय झाला.
तर श्रीमंत माणसाला वाटतं की भरपूर पैसा आला की तो खर्च करायचं स्वातंत्र्य असतं, त्यामुळं मला जे पाहिजे ते मिळवायला कसलीही तडजोड करायला लागणार नाही. जास्त पैसा इथं काळजी मिटवणारा विषय झाला.
३- गरीब माणूस आपलं समाधान करून घेतो आणि म्हणत असतो की श्रीमंत व्हायला भाग्य लागतं, भाग्य.
कुणी पण श्रीमंत नाही होत. पार वर पर्यंत वशिला असायला लागतो मग तसं काम मिळतं, आणि तोच माणूस श्रीमंत होतो.
इथं स्वतः लायक नसल्याची भावना, म्हणजे नकारात्मक विचार .
पण श्रीमंत माणसाचे विचार उलट असतात.. म्हणजे तो आधीच ठरवतो की मला श्रीमंत व्हायचंय, आणि त्यासाठी मला भरपूर मेहेनत करायची आहे, त्यासाठी माझ्या आयुष्यात मी काही बदल सुद्धा करीन.
४- सर्व सामान्य माणूस हा दर महिन्याला ठराविक रक्कम हातात आली पाहिजे ह्या साठी नोकरीचा मार्ग पकडतो , अशा नोकरीत तो समाधानी होतो.
पण श्रीमंत कधी एक ठराविक इन्कम बघत नाही तर तो दोन चार मार्गांनी आपलं उत्पन्न कसं येईल आणि ते कसं वाढत राहील ह्याची धडपड करत असतो. आणि त्या धडपडीत तो आनंद पण मिळवतो.
५- नोकरीत समाधानी असलेला गरीब राहील त्याचं कारण, तो म्हणतो की माझा घराचा रोजचा सगळा खर्च भागवून जे काही उरतील ते बचत म्हणून बाजूला ठेऊ शकतो. आधी खर्च आणि नंतर बचत.
श्रीमंतीची स्वप्न बघणारा असा विचार करेल की हातात पैसा आला की आधी त्यातली २० टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवीन आणि नंतर बाकीचे ८० टक्के कसे खर्च करायचे ते ठरवीन. आधी बचत आणि नंतर खर्च.
६- समाधानी माणूस म्हणतो की माझी नोकरी जशी आहे तसा मला पगार मिळायला पाहिजे.
म्हणजे पार्ट टाईम नोकरी तर पगार कमी, आणि फुल टाईम असेल तर पूर्ण पगार. त्याच्या पुढे हा जात नाही.
पण श्रीमंत होणारा म्हणतो, मी जेवढी माझ्या कामात मेहेनत करीन तसा त्याचा मला मोबदला मिळायला पाहिजे. म्हणजे जास्त पैशासाठी जास्त मेहेनत सुद्धा करायची तयारी.
७- गरीब असणारा माणूस संधीची वाट बघत थांबतो. त्यात त्याचा बराच वेळ खर्च होतो.
पण श्रीमंती कडे वाटचाल करणारा माणूस संधीची वाट नाही बघत, तर तो स्वतःच संधी निर्माण करतो.
८- गरीब जर त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन काम करायला लागला आणि पुढं जाऊन त्याला पाहिजे तसं यश मिळालं नाही तर विचार करतो की मला ह्यात यश नाही मिळालं.
म्हणजे ही आपल्याला न जमणारी गोष्ट आहे. ह्यात पुढं जाणं शक्य नाही.
पण सकारात्मक विचार करणारा जरी यश नाही मिळालं तरी विचार करेल की ह्यात नाही आपल्याला यश मिळालं, हरकत नाही. दुसऱ्या रस्त्याने जाऊन बघू, कदाचित तो रस्ता यश मिळवून देईल.
९- जाईन तर स्वतःच्या पैशाच्या जोरावर पुढं जाईन. पण दुसऱ्याचा पैसा घेऊन डोक्याला त्रास करून घेणार नाही. असा विचार करून मोठं यश मिळत नाही. ते मिळवायला आयुष्य खर्च करावं लागतं. आणि पदरी पडते निराशा.
उलट श्रीमंत होणारा काय विचार करेल? तो म्हणेल मी लोकांना ह्या कामासाठी पैसे गुंतवायला तयार करीन, आणि ते लोक माझ्यावर पैसे लावायला राजी होतील. आत्मविश्वास माणसाला तशी क्षमता निर्माण करून देतो.
१०- मला ह्या कामात स्मार्ट व्हायला पाहिजे. असा विचार येतो पण तसं काम होत नाही. कारण त्यासाठी निर्णय क्षमता कमी पडते म्हणून माणूस मागे राहतो.
स्मार्ट होण्यासाठी श्रीमंत माणूस अशा स्मार्ट लोकांच्या, निष्णात लोकांच्या सहवासात राहून चांगल्या चांगल्या योजना, कल्पना अंमलात आणून आपलं भलं करून घेतो. आणि कमी वेळात श्रीमंत होतो.
तुमची काम करण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आकलन करण्याची क्षमता, संकटांशी सामना करण्याची क्षमता, अशा सगळ्या क्षमता मिळून तुमच्यात तयार होणारी ऊर्जा तुम्हाला श्रीमंत बनवू शकते.
ह्या क्षमता तुमच्यात असतातच पण तुमच्यात आत्मविश्वास नसेल आणि नकारात्मक विचार सतत करत असाल तर तुमची आर्थिक गरिबी आणि श्रीमंती ह्यातलं अंतर वाढत जातं.
गरिबीच्या ह्या १० नकारात्मक गोष्टी काढून टाकून श्रीमंतीकडे वाटचाल करायला सकारात्मक विचार करून तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमच्या क्षमता उर्जित करा.
जो गरिबी आणि श्रीमंती ह्या दोन गोष्टीतले अंतर कमी करत जाईल त्याला धो धो कमाई करता येईल.
म्हणूनच यशस्वी लोक म्हणतात ‘Think big’. म्हणजेच आपल्याला मोठे माईलस्टोन पार करण्याची मनःशक्ती मिळते.
त्या दिशेने आपली विचारधारा बदलते, सरावते आणि मग ‘छप्पर फाड के’ यश मिळण्यास नक्कीच सुरुवात होते..
तर मित्रांनो अपयशाला घाबरू नका.. लक्ष्याचा पाठलाग सुरू करा.. आणि नकारात्मकतेला करा कायमचा अलविदा..!!
आणि ‘Think big’ असं म्हणत मनाचेTalks कडून मनस्वी शुभेच्छा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.