कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता भारतात रशियाने बनवलेली स्पुटनिक-V ही लस देखील येऊ घातली आहे.
स्पुटनिक-V ह्या लसीच्या भारतातील आयातीला आता मान्यता मिळते आहे.
आणि त्याबरोबरच ह्या लसीच्या परिणामकारकतेविषयी चर्चा देखील सुरु झाली आहे.
स्पुटनिक-V ह्या लसीमूळे मिळणारी प्रतिकारशक्ती आणि ह्या लसीचे साइड इफेक्टस् हयाबद्दल सगळीकडे चर्चा सुरु आहे.
खरंतर कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक-V ह्या तिन्ही लसी करोना वायरसवर परिणामकारक आहेत.
परंतु त्यांच्या साइड इफेक्टस् मध्ये मात्र काही प्रमाणात फरक आहेत.
स्पुटनिक- V ही भारतीय लसींच्या तुलनेत जास्त उपयुक्त आहे का ?
स्पुटनिक-V ह्या लसीच्या रशियामध्ये घेतलेल्या चाचण्यांच्या आधारे ही लस करोनाविरुद्ध ९१.६% परिणामकारक आढळली आहे.
तर भारतीय बनावटीची कोवॅक्सिन ही लस ८१ % परिणामकारक आढळली आहे.
तसेच कोविशिल्ड ही भारतात निर्माण केलेली लस जी जगभर सर्वत्र लोकांना दिली गेली ती पहिल्या डोसनंतर ७०.४ % तर दुसऱ्या डोसनंतर ९१% इतकी परिणामकारक ठरली आहे.
ह्या लसींचे साइड इफेक्टस् होतात का ?
जगभरात सर्वत्र कुठेही दिल्या जाणाऱ्या कोणत्याही लसीचे साइड इफेक्टस् हे असतातच.
कारण लस दिल्यानंतर शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती हे इफेक्टस् तयार करते.
हे सगळे साइड इफेक्टस् २, ४ दिवसात कमी होऊन पूर्णपणे नाहीसे होतात.
त्याचा फारसा त्रास देखील बहुतांश लोकांना होत नाही.
लसीचे साइड इफेक्टस् जाणून घेणे महत्वाचे का आहे ?
कोणतीही लस घेताना तिचे साइड इफेक्टस् जसे की ताप येणे किंवा हात दुखणे हे लस घेणाऱ्या व्यक्तीला आधी माहीत असतील तर ती व्यक्ति लस घेण्यापूर्वी तशी मानसिक तयारी ठेवू शकते.
शिवाय ह्यापेक्षा गंभीर साइड इफेक्टस् जसे की रक्तात गुठळी होण्याची शक्यता होऊ शकणारी लस न घेता तुलनेनी सेफ असणारी लस घेण्याचे स्वतंत्र देखील मिळू शकते.
त्यामुळे लसीचे साइड इफेक्टस् आधी माहीत असणे आवश्यक ठरते.
स्पुटनिक-V ह्या रशियन लसीचे साइड इफेक्टस् काय आहेत ?
रशियातील गामेलेया नॅशनल सेंटर कडून निर्माण केली गेलेली स्पुटनिक-V ही लस जगभरात देण्यासाठी तयार झालेल्या पहिल्या लसींपैकी एक आहे.
ह्या लसीमुळे किरकोळ स्वरूपाचे साइड इफेक्टस् होतात जे फारसे त्रासदायक नसतात. कोणते ते आपण पाहूया.
१. डोकेदुखी
२. थकवा
३. फ्लू सारखी लक्षणे
४. इंजेक्शन दिलेल्या जागेवर दुखणे
असे अगदी साधे आणि किरकोळ साइड इफेक्टस् स्पुटनिक-V ह्या लसीचे होतात.
ह्यापेक्षा गंभीर स्वरूपाचे साइड इफेक्टस् झालेले आढळून आले नाहीत.
कोवॅक्सिनचे साइड इफेक्टस् काय आहेत ?
कोवॅक्सिन ही हैदराबादच्या भारत बायोटेक ह्या कंपनीने बनवलेली लस आहे.
ही लस कोविडचा मृत वायरस वापरुन शरीरात कोविडविरोधी प्रतिजैविके तयार करते.
ही लस अगदी पारंपरिक लस बनवण्याच्या पद्धतीने बनवली गेली असल्यामुळे, ह्या लसीचे साइड इफेक्टस् तुलनेने कमी त्रासदायक आहेत. कोणते ते पाहूया –
१. इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे
२. ताप येणे
३. घाम येणे किंवा थंडी वाजून येणे
४. उलटी होणे
५. डोकेदुखी
आधीपासून काही आजार असणाऱ्या लोकांनी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून मगच लस घ्यावी.
कोविशिल्डचे साइड इफेक्टस् काय आहेत ?
ही लस जगभरातल्या ६२ देशांमध्ये दिली गेली आहे. आणि अगदी नगण्य प्रमाणात ह्या लसीचे काही गंभीर साइड इफेक्टस् आढळून आले आहेत.
गंभीर साइड इफेक्टस् पैकी महत्वाचा म्हणजे रक्तात गुठळी निर्माण होणे.
परंतु ह्या साइड इफेक्टची जगभरातील टक्केवारी अतिशय कमी आहे.
ह्या लसीमुळे होणारे कॉमन साइड इफेक्ट हे इतर दोन लसींसारखेच आहेत आणि ते २, ३ दिवसात कमी देखील होतात.
त्यामुळे कोविशिल्डदेखील तितकीच प्रभावी आणि उपयुक्त लस आहे हे सिद्ध झाले आहे.
कोविशिल्डचे साइड इफेक्टस् कोणते ते पाहूया –
१. इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे
२. मध्यम ते तीव्र ताप येणे
३. थकवा
४. इंजेक्शन दिलेला हात जड होणे
५. डोकेदुखी आणि अंगदुखी
परंतु हे साइड इफेक्टस् तात्पुरत्या स्वरूपाचे असून ते २,३ दिवसात कमी होतात.
आपण कोणती लस घ्यावी ?
सर्व लसींचे होणारे साइड इफेक्टस् आता आपल्याला माहीत झाले आहेत.
परंतु त्यामुळे घाबरून न जाता आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व लसी ह्या अत्यंत सुरक्षित आहेत आणि त्या पूर्णपणे परीक्षण आणि चाचण्या करून झाल्यावरच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे सध्या जेव्हा आणि जी लस उपलब्ध असेल ती ताबडतोब घेऊन स्वतःचा करोनापासून बचाव करण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे.
सर्व लसी सुरक्षित आणि परिणामकारक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
तर मित्रांनो लवकरात लवकर जी मिळत असेल ती लस, सकारात्मक विचार ठेऊन घ्या. नक्कीच ती तुमच्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण करेल आणि करोनापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.