कामाच्या रगाड्यात तरतरी येण्यासाठी चहा हवा असतो. काही वेळा कामामुळं, ताणामुळं डोकं भणाणून जातं.
अशावेळी “एक गरम चाय की प्याली हो…” असं म्हणत कपावर कप प्यायले जातात.
कधी रोजच्या ठराविक वेळेच्या चहानंतर सुद्धा मित्रमैत्रिणींबरोबर चहा घेतला जातो.
तर कधी प्रचंड कामानंतर चहा पिऊन रिलँक्स व्हायचं असतं.
काहींना तर चहा प्यायल्याशिवाय काम करण्याचा उत्साहच येत नाही. “उन्हाळा असो की हिवाळा चहा हवा”
कोणाच्या घरी गेलात तरी अर्धा कप चहाचा आग्रह होतोच.
“मी काय रात्री बारा वाजता सुद्धा चहा प्यायला तयार असतो ” असं म्हणणारी लोकं ही आहेत.
पण तुमची ही सवय तुम्हांलाच घातक ठरू शकते. त्यामुळे वेळीच जागे व्हा….
भारतात सर्वात लोकप्रिय पेय कोणतं असं विचारलं तर नक्कीच चहा अग्रस्थानी येईल.
नुसत्या गरम चहाच्या कपाच्या स्पर्शाने आनंदून जाणारे लोक आहेत.
चहा ज्यांचा जीव की प्राण आहे अशा लोकांनी चहाच्या कपाला मोजून मापूनचं जवळ करावं नाहीतर आरोग्याला भयंकर धोका निर्माण होऊ शकतो.
खरं तर योग्य प्रमाणात, आलं गवती चहा घालून चहा प्यायलात तर तो आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.
दिवसभरात जास्तीत जास्त 1 ते 2 कपापर्यंत चहा प्यायला पाहिजे. यापेक्षा संख्या तुम्ही कमीच ठेवलीत तरी चालेल पण यापेक्षा वाढवू मात्र नका.
यापेक्षा जास्त चहा म्हणजे आजारांना आमंत्रणच.
जास्त चहा प्यायल्याने होणारे नुकसान
1) आयर्नची कमतरता
खूप चहा प्यायल्यामुळं होतं काय की शरीरात आयर्नची कमतरता निर्माण होते.
आयर्नची कमतरता ही चहातल्या टँनीनमुळं होते.
अर्थातच तुमच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
2) छातीत जळजळ
रोज साधारण 2 कपापेक्षा जास्त चहा प्यायल्यानं पित्ताची त्रास वाढतो हे तुम्ही कधी ना कधी अनुभवलंच असेल.
खरचं मित्रांनो चहामुळे पित्ताचा त्रास वाढतोच, आणि छातीत जळजळायला सुरू होतं.
पित्त घशाशी येतं आणि तुम्ही अस्वस्थ होता.
3) डोकेदुखी
पावसात भिजून आल्यावर डोकं गच्च झालं किंवा थंडीने डोकं दुखत असेल तर पटकन घरातले म्हणतात “आलं घालून चहा देऊ का? बरं वाटेल”
काही अंशी ते बरोबर ही असतं. पण अतिचहापानामुळे सुद्धा डोकेदुखी वाढू शकते, हे तुम्हांला माहिती आहे का?
याचं कारण चहामधलं कॅफिन असतं. काहीवेळा हे कॅफिन डोकेदुखी कमी करायला मदत करतं.
तरतरी देतं.
मात्र चहाच्या अतिरेकामुळे कॅफिनचा ही अतिरेक होतो आणि डोकेदुखी सुरू होते.
4) औषधं प्रभावहीन ठरतात.
ऋतु बदलला की तुम्ही सर्दी पडशानं हैराण होतात. तुमच्या पैकी काही जण शुगर आणि बी.पी.च्या गोळया नियमित घेत असाल.
तर अशा वेळी लक्षात घ्या जास्त चहा प्यायल्यामुळं औषधांची मात्रा लागू पडत नाही.
काही जण काय करतात गरम पाण्याऐवजी गरम चहा बरोबर औषधं घेतात.
औषधांबरोबर चहाची जोडी जमली की औषधं प्रभावहीन ठरतात, आणि आरोग्य ढासळायला लागतं.
5) एंटीबायोटिक्सचा ही प्रभाव घटतो
व्हायरल इन्फेक्शन झालं की, त्यावर डॉक्टर
एंटीबायोटिक्सचा डोस देतात. काहीजण या टँब्लेटसुद्धा चहाबरोबर घेतात.
अशावेळी लक्षात घ्या एंटीबायोटिक्सचा डोस कितीही स्ट्रॉंग असला तरी तो चहापुढे फुसका होऊन जातो आणि तुमचं आरोग्य आणखी बिघडतं.
चहा घरात किंवा बाहेर ही सहज उपलब्ध होतो बऱ्यापैकी खिशाला परवडणाराही असतो.
त्यामुळे चहा पिताना आपण त्याच्या दुष्परिणामांचा विचार कधीच करत नाही.
आरोग्यदायी सुदृढ आयुष्य हवं असेल तर मात्र चहाच्या प्रमाणावर आठवणीनं नियंत्रण ठेवा.
पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात, चहा आणि ऋतू दोन्ही एंजॉय करा मात्र एका ठराविक मर्यादेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.