‘फ्रोझन द्राक्षे’ हा स्नॅक्स चा प्रकार ऐकलाय का तुम्ही?
या लॉक डाऊनच्या दिवसांत आपलं बाहेरून काही स्नॅक्स आणून खाणं जवळजवळ बंदच झालं.
आणि लॉकडाऊन च्या चांगल्या परिणामांपैकी हा एक परिणाम आहे.
या दिवसांत आपण घरी राहून हटके, इंटरेस्टिंग असं काय काय करता येईल याच्या शोधात असतो.
तसंच घरातच करण्यासारखा आणि आरोग्यदायी असा एक स्नॅक्सचा प्रकार आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सध्या बाहेर जाऊन काही करणं, आणणं जरी शक्य नसलं तरी बाजारात जाऊन किंवा घराजवळ सोय असेल तर तिथून फळं, भाज्या आणणं एवढं आपण करू शकतो.
हे रिफ्रेशिंग, हेल्दी आणि कमी कॅलरीज असणारे स्नॅक्स म्हणजे ‘फ्रोझन द्राक्षे’
ही फ्रोझन द्राक्षे एखादया फ्रोझन कँडी सारखी चवदार लागतात बरंका!!
हे करून पाहिल्यावर खरंतर मला वाटलं आजपर्यंत हे मला सुचलं कसं नाही?
गम्मत म्हणजे द्राक्ष आवडत नाहीत म्हणून तिकडे ढुंकूनही न पाहणारा माझा मुलगा स्नॅक्स म्हणून समोर येणारे द्राक्ष एका झटक्यात संपवतो.
तुम्ही पण हे जर कधी करून बघितलं नसेल तर आता नक्की करून बघा.
यासाठी तुम्हाला हिरवे किंवा काळे कुठलेही द्राक्ष वापरता येतील.
करण्याची अगदी सोपी पद्धत:
द्राक्षांवर खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य, पेस्टीसाईड्स वापरलेली असतात त्यामुळे ती नेहमीप्रमाणे अगदी स्वच्छ धुऊन घ्यावीत.
धुऊन कोरडी केलेली द्राक्ष रात्रभर झिपलॉक असलेल्या प्लास्टिक मध्ये ठेवावी..
द्राक्षांमध्ये आधीपासूनच साखरेचे प्रमाण असतेच पण तरीही जर द्राक्ष आंबट असतील तर त्याला बाहेरून साखरेचा बारीकसा थर दिला तरी ८ ते ९ तासांमध्ये तयार होणारे फ्रोझन द्राक्ष हे अगदी अमेझिंग असे लागतात.
हा झाला अगदी सोपा प्रकार.
दुसरा प्रकार आहे. ‘चॉकलेट फ्रोझन द्राक्षे’
फ्रीझर मध्ये ठेवण्याआधी या द्राक्षांना लिक्विड चॉकलेटचा थर दिला तरी हे चवीला खूप मस्त लागतात.
फ्रोझन द्राक्षांचा उपयोग:
१) स्नॅक्स: याचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात चविष्ट स्नॅक्स म्हणून करता येतो.
२) वाइन मध्ये: वाइन प्रेमींनी आईस क्यूब च्या जागी फ्रोझन द्राक्षांचा उपयोग नक्की करून पाहा. शिवाय वाइन संपल्यावर ग्लासमध्ये खाली हे खुसखुशीत द्राक्ष तुमची वाट पाहत असतील.
३) हेल्थ कॉन्शस लोकांसाठी: जे लोक वजन आटोक्यात ठेवण्यासाठी कॅलरीच्या काट्याकडे लक्ष ठेऊन असतात. त्यांना कँडी किंवा काहीही गोड चघळण्याचा मोह झाला तर ‘फ्रोझन द्राक्ष’ हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे.
चला तर मग करून बघा हे ‘फ्रोझन द्राक्षे’ आणि उन्हाळ्यात इतर फळांचा उपयोग करून असे कोणते प्रकार करता येतात तेही कमेन्ट मध्ये सांगा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.