नादिया मुराद हे नाव सामान्य लोकांना माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही! आपल्या आयुष्यातले आदर्श हे सिनेमा आणि राजकारणापलीकडे जात नाहीत म्हणून ही नावं आपल्या ध्यानीमनी ही नसतात. स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समानता ह्याची आवई उठवून त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेकांना पण हे नावं माहित नसेल.
कोण आहे ही नादिया मुराद? असं काय केलं आहे तिने की ज्याच्यासाठी तिला जगातील सगळ्यात प्रतिष्ठित अशा २०१८ च्या नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नादिया मुराद चं आयुष्य म्हणजे मानवतेला काळिमा फासणाऱ्या पण त्याचवेळी त्यातून पुन्हा बाहेर येऊन जगाच्या पातळीवर स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती आणि स्त्री समानता ह्या गोष्टींचं एक जिवंत उदाहरण आणि प्रतिबिंब आहे.
पुरुषाने स्त्री ला कसं आपलं खेळणं म्हणून वापरलं आहे, कसे तिच्यावर अत्याचार केले आहेत हे सर्व नादिया मुराद च्या शब्दातून वाचलं, तर मला आणि माझ्यासोबत इतर अनेक पुरुषांना आपण पुरुष असल्याची लाज वाटेल इतकं हे भयावह आहे! ह्या सगळ्यातून नादिया मुराद ने केलेला प्रवास एकीकडे डोळे ओले करतो. चीड आणतो तर दुसरीकडे माणूस माणुसकी विसरला आहे ह्याची जाणीव करून देतो. ह्या सर्व गोष्टीतून पुन्हा एकदा उभं राहून आपल्यावर झालेल्या ह्या भीषण कृत्यांची सर्व जगाला जाणीव करून देताना नादिया मुराद ने अनेक स्त्रियांच्या मनातलं दु:ख जागतिक पटलावर तितक्याच प्रभावीपणे मांडलं आहे.
नादिया मुराद, ‘कोचो, सिंजर, इराक’ येथे १९९३ साली जन्माला आली. ती इराक मधल्या ‘याझीदी’ ह्या जमातीत. तिचं कुटुंब शेती करून आपली गुजराण करत होतं. आपली आई व ६ सख्खे आणि चुलत भावांसोबत आयुष्य सुरळीत चालू होतं. पण १५ सप्टेंबर २०१४ ला सगळं आयुष्य बदललं. इस्लामिक स्टेट इराक (आयसिस) ने त्यांच्या गावावर कब्जा केला. जवळपास १५० पेक्षा जास्त स्त्रियांना बंदी बनवलं गेलं. त्यात नादिया मुराद ही एक होती. मग सुरु झाला एक नरकापेक्षा वाईट असणारा प्रवास. ज्याची कल्पना आपण एक वाचक म्हणून केली तरी अंगावर शहारे उभे राहतात. नादियाला बंदी बनवून ‘मुसोल’ इकडे आणलं गेलं. अमानुष अत्याचार तिच्यावर आणि सगळ्या बाकीच्या स्त्रियांवर करण्यात आले. तिला मारण्यात आलं. अनेकदा बलात्कार करण्यात आला. पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून गैंग रेप करण्यात आला. अनेकदा तिला विकण्यात आलं. सिगरेट चे चटके देण्यात आले. त्याही पलीकडे जी अमानवीय वागणूक दिली गेली ते लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील इतकी क्रूरता आहे त्यात!!
इस्लामिक स्टेट इराक (आयसिस) च्या कैदेतून नादिया कशीबशी निसटली. उत्तर इराक च्या एका शरणार्थी शिबिरात तिने आश्रय घेतला. फेब्रुवारी २०१५ ला तिने एका बेल्जियन वृत्तपत्राच्या वार्ताहराला आपली कथा सांगितली. २०१५ ला १००० शरणार्थींना जर्मन सरकारने आपल्या देशात राहण्याची मुभा दिली. त्यात एक नादिया होती. डिसेंबर २०१५ ला नादियाने ‘युनायटेड नेशन’ च्या सिक्युरिटी कौन्सिल मध्ये मानवी तस्करी आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात वाचा फोडली. तिने मानवतेला काळिमा फासणाऱ्या क्रूर पद्धतींना जगाच्या अनेक पातळीवर वाचा फोडली. ह्यासाठी तिला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या ही आल्या. पण तिने आपला लढा सुरु ठेवला. ह्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. नादिया मुराद चा हा संघर्ष आणि स्त्रियांवर इस्लामिक स्टेट ‘इराक’ म्हणजेच ‘इसिस’ने केलेले अमानुष अत्याचार ऐकून पूर्ण युनायटेड नेशन ढवळून निघालं. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी तिला जगातील सगळ्यात प्रतिष्ठित अशा नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं.
नादिया मुराद ने जेव्हा ते काळेकुट्ट क्षण जगासमोर आपल्या शब्दात मांडले तेव्हा खरंच माणुसकी हरली. नादिया सांगते,
“रात्रीच्या वेळी बाजार सुरु व्हायचा. सैन्यातील लोक खालच्या मजल्यावर आपली नाव नोंदणी करायचे. थोड्या वेळाने एक जण आत यायचा. त्या पाशवी नजरेने आम्हा सगळ्यांना बघायचा. त्याची नजर आमच्या चेहऱ्यापासून ते पायापर्यंत सगळ्याच उभारांकडे जायची. त्यातल्या त्यात चांगल्या दिसणाऱ्या मुलीवर त्याची नजर थांबायची. मग तो विचारायचा, किती वर्षाची आहेस? सगळ्या मुली ओरडत, रडत असायच्या. दयेची भीक मागायच्या पण त्या हपापलेल्या नजरांना वासनेशिवाय काहीच दिसत नव्हतं. तो तिकडे पहारा देणाऱ्या रक्षकाला विचारायचा, “ही वर्जिन आहे न?” मग एक एक जण एकेकीला उचलून घेऊन जायचा. त्यानंतर जे व्हायचं ते शब्दांपलीकडचं, अमानुष आहे. सिगरेटचे चटके, मारहाण, पाशवी बलात्कार तर रोजचं होतं.”
I wanted to tell them that so much more needed to be done. We needed to establish a safe zone for religious minorities in Iraq; to prosecute Isis – from the leaders down to the citizens who had supported their atrocities – for genocide and crimes against humanity; and to liberate all of Sinjar. I would have to tell the audience about Hajji Salman and the times he raped me and all the abuse I witnessed. Deciding to be honest was one of the hardest decisions I have ever made, and also the most important.
नादिया मुराद चे शब्द मला निशब्द करून गेले. युनायटेड नेशन मध्ये दिलेल्या भाषणात ती म्हणते,
I told them about how I had been raped and beaten repeatedly and how I eventually escaped. I told them about my brothers who had been killed. It never gets easier to tell your story. Each time you speak it, you relive it. When I tell someone about the checkpoint where the men raped me, or the feeling of Hajji Salman’s whip across the blanket as I lay under it, or the darkening Mosul sky while I searched the neighborhood for some sign of help, I am transported back to those moments and all their terror.
तिचा प्रत्येक शब्द कुठेतरी आतून येतं होता. कुठेतरी मला आत पोखरत होता. त्या शब्दांनी सगळ्या भावना, राग, चीड सगळंच असं आतवर खोलवर जखम करून गेलं. नादिया मुराद ला हे सगळं पुन्हा एकदा जगापुढे सांगताना किती कठीण गेलं असेल?
तिचे ते शब्द,
Deciding, to be honest, was one of the hardest decisions I have ever made, and also the most important.
मला कुठेतरी निशब्द करून गेले. तो त्रास, त्या यातना काय असतील ह्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही! पण ह्या सगळ्यातून ‘नादिया मुराद’ ने आपली आणि संपूर्ण याझिदी स्त्रियांवर झालेला अमानुष अत्याचार जगापुढे मांडला आणि जगाला विनंती केली,
When I finished telling my story, I continued to talk. I told them I wasn’t raised to give speeches. I told them that every Yazidi wants Isis prosecuted for genocide and that it was in their power to help protect vulnerable people all over the world. I told them that I wanted to look the men who raped me in the eye and see them brought to justice. More than anything else, I said, I want to be the last girl in the world with a story like mine.
तिच्या ह्या लढ्याला यश येईलच; पण तिची कथा मला स्वतःला कुठेतरी अस्वस्थ करून गेली आहे. तिने आपली ही कथा एका पुस्तकात मांडली आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे…
तिचं पुस्तक तर मी वाचणार आहेच पण नादियाचं स्वप्न की ह्या सगळ्या यातनातून जाणारी मी शेवटची मुलगी / स्त्री असो. हे पूर्ण करण्याची जबाबदारी नकळत एक पुरुष म्हणून मला जाणवली. कुठेतरी स्त्री ला वस्तू पलीकडे बघण्याची मानसिकता समाजात निर्माण करण्यात आपण कमी पडतो आहोत हे निश्चित! त्याशिवाय इतक्या क्रूरतेची मानसिकता ठेवणारे आणि त्याचं समर्थन करणारे ह्या जगात ताठ मानेने वावरू शकतात ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे.
नादिया, तुझ्या लढ्याला माझा सलाम! तुझं पुस्तक माझ्या घरी आलं असलेच. तुझा हा लढा अनेक स्त्रियांना स्फूर्तीदायक ठरेल ह्यात शंकाच नाही. तुझ्या अभूतपूर्व साहसाला नमन….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.