सुखी वैवाहिक जीवन जगण्याचे चार नियम!

सर, माझे वय बेचाळीस वर्ष आहे. लग्नाला एकोणीस वर्ष झाली, दोन मुली आहेत,

लग्न झाल्यापासुन, माझ्या पत्नीशी माझं कधीही जमलचं नाही, सर!

कायम भांडण, सारखे खटके उडतात, माझ्या आई वडीलांशी तिने कधी जुळवुन घेतलं नाही, वडीलांना हार्ट प्रॉब्लेम आणि आईला डायबेटीस असुनही आई वडीलांपासुन वेगळा राहतो.

मागच्या पाच सहा वर्षांपासुन पत्नी शारीरीक संबंधाना नकार देते,

ह्या वयात माझ्या तिच्याकडुन अशा अपेक्षा चुकीच्या आहेत, असं तिचं म्हणणं आहे,

ह्या तिच्या वागण्यामुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे. कामात लक्ष लागत नाही, आई वडील आजारी असतात, त्यामुळे ही मी सतत चिंतेत असतो,

ही गोष्ट चारचौघात बोलताही येत नाही, ह्या सगळ्याचा माझ्या मुलींवरही परिणाम होत आहे,

माझे काय चुकत आहे, सर?

XXX जी, इतक्या प्रामाणिक पणे आणि मोकळेपणाने प्रश्न मांडलात, याबद्द्द्ल मनःपुर्वक अभिनंदन!

तुमचा प्रश्न वाचला आणि क्षणभर गोंधळात पडलो, काय उत्तर देऊ तुम्हाला?

खरचं काही प्रश्न अशी उत्तरं शोधल्याने सुटतात?….

त्यात अनेक वर्षांपासुन, नात्यांच्या गुंत्यांना पडलेली अशी सुत्तर-गाठ सहजपणे सोडवता येईल का?

संदीप महेश्वरीच्या ‘आसान है’ ह्या परवलीच्या शब्दांचा मान ठेवु आणि प्रश्नांची उत्तरे शोधु!

आजकाल नवरा बायकोचं नातं हे बॅंक आणि कस्टमर सारखं झालं आहे, बॅंकेत जितकं जास्त डिपॉझीट करता, तितकं जास्त व्याज मिळतं.

तुमचा प्रश्न आहे की मला इंट्रेस्ट का मिळत नाही?

अहो! तुम्ही तर कर्जाच्या आणि इ. एम. आय. च्या ओझ्याखाली दबल्या गेले आहात. प्रेम का आटलं, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला फार खोलात जायची गरज नाही.

प्रेम मिळावण्यासाठी अधिक अधिक प्रेम करा, इतकं सोपं आहे हे!

एकदा जर का हे समजलं की वैवाहीक आयुष्य सुखाचं बनतं!

आपण शर्ट घेतला, नाही आवडला, तर टाकुन देता येतो, नवा घेता येतो.

गाडी वापरुन वापरुन जुनी झाली तर नवीन मॉडेल घेता येतं.

जुनं घर अपुरं पडु लागलं तर नवं घर बांधता येतं.

पण लग्न ही अशी रिलेशनशीप आहे ना, जिथे कितीही त्रास झाला तरी सहजासहजी नातं तोडता येत नाही.

माझ्या लग्नाला पाचच वर्ष झाली पण मला हे खुप लवकर समजलं, उमगलं, अगदी हेवा करावा इतका माझा संसार सुखाचा आहे.

आणि म्हणुन आज मी तुम्हाला हक्काने काही गोष्टी सांगणार आहे.

१) नात्याला प्राधान्य द्या

आयुष्यात चार प्रकारच्या अत्यावश्यक गरजा असतात.

पैसा, आरोग्य, मानसिक समाधान, आणि आपल्या जीवनसाथी असलेल्या व्यक्तीशी नातेसंबंध.

तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्यांमध्ये प्रेमाच्या नातेसंबंधाना प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे.

त्यातही प्रेमाच्या नात्याला कोरडं पडुन शुष्क आणि रुक्ष होण्याआधी , त्याला भावनांचा ओलावा देऊन जगवण्याची वेळ आली आहे.

माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही प्रेम करायला शिकलात का?

ह्या पृथ्वीवर प्रत्येक माणसाने प्रेम करायला शिकलेच पाहिजे.

ते ही पुन्हा, पुन्हा, रोज रोज!…..

द्वेष करायला शिकण्याची आवश्यकता नसते.

प्रेम करण्याचे शिक्षण मात्र माणसाला प्रयत्नपुर्वक घ्यावे लागते.

तुम्हाला जीवाभावाचे म्हणावेत असे मित्र आहेत का?

मित्रांवर प्रेम कसे करावे हे माहित असणार्‍या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी असते.

बहुतांश पुरुषांना मैत्री करण्याच्या कलेचा सराव नसतो.

छोट्या छोट्या मुली तुम्हाला हातात हात घालुन शाळेत जाताना दिसतील. खेळताना किंवा अंधारात एकमेकांना गच्च धरुन ठेवतील. लाडात एकमेकींना मिठीत घेतील, बरोबरीने रडतील आणि गळ्यात पडुन म्हणतील, तु माझी सर्वोत्कृष्ट मैत्रीण आहेस.

छोटी मुलं अशा प्रकारे वागताना क्वचितच दिसतील.

वाढत्या वयासोबत पुरुषांच्या मनात एक पोकळी तयार होते, जसजसा तो व्यावसायिक यशस्वीतेच्या पायर्‍या चढत जातो, त्याचा इगो त्याला इतरांपासुन दुर नेण्यात कारणीभुत ठरत जातो.

फारच थोड्या पुरुषांना मन मोकळं करण्याची, प्रेमळ मित्रसंबंध अनुभवण्याची संधी मिळते.

पुरुषांची मैत्री ही फक्त कोणत्या तरी कृतीशी किंवा कार्यक्षेत्राशी निगडीत असते. स्त्रियांचं विश्व मात्र मात्र परस्पर सहभाग, भावनिक शेअरींग याभोवती गुंफलेलं असतं!

नेमकं इथचं घोडं पेंड खातं!

म्हणुन सुखी वैवाहिक जीवनाचा नियम पहिला – तिला प्रायोरीटी द्या!

२) जसे आत, तसे बाहेर!

असे लोक लोकप्रिय असतात, जे मुखवट्याशिवाय जगतात.

स्वच्छ, नितळ, पारदर्शी!

जर तुम्ही स्वखुशीने, प्रांजळपणे आणि मोकळेपणे वागलात तर तुमच्यावर प्रेम करणारे लोक तुम्हाला निश्चितपणे भेटतील.

जसं बडेजाव, मोठेपणाचा आव, बढाया, मी ग्रेट ही भावना आपलं इतरांपासुन अंतर वाढवते, तसं गप्प गप्प राहणे, व्यक्त न होणे, मनातल्या मनात ठेवणे, मुकेपणाने वावरणे अशा वागण्यानेही आपण आपल्या भावनांना योग्य प्रकारे हाताळु शकत नाही.

आपल्या लाईफ पार्टनर सोबत आपण शंभर टक्के प्रामाणिक राहिले पाहीजे.

मनाचा थांगपत्ता लागु न देणारे लोक आपल्या खर्‍या भावना लपवतात, आणि तिथेच दरी पडण्याची सुरुवात होते.

त्याउलट प्रामाणिकपणा प्रेमसंबंध वाढवण्यात उपकारक ठरतो. आपण निरागसपणे जगु लागलो की लोकंही जसे असतील तसे आपल्यासमोर सादर होतात.

आपल्या अवतीभवतीच्या अभेद्य भिंती तोडा. आपल्या माणसांसाठी घातलेली तटबंदी उध्वस्त करा.

कणखर, सहनशील, आत्मविश्वासु, भावनांचे प्रदर्शन न करणार्‍या, जेम्स बॉन्ड सारखे कठोर रुप सोडा.

सुखी वैवाहिक जीवनाचा नियम दुसरा – पारदर्शकतेची कास धरा.

३) प्रिये, माझे तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे.

पुलवामा हल्यामध्ये शहिद होणार्‍या एका गंभीर जखमी जवानाचे शेवटचे बोल काय होते, माहित आहे?

“प्रिये, माझे तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे.”

मरण्याआधी त्याला आई वडील, इन्शुरंस, मुलांचे शिक्षण, भाऊ बहिण, प्रॉपर्टी सगळ्यापेक्षा तिची आठवण आली.

आपण आपल्या प्रियजनांना आपल्या जाहीर प्रेमाची कबुली फार कमी वेळा देतो.

आपल्या पत्नीवर प्रेमाचा, सदभावनांचा वर्षाव करुन बघा, ती ही तुमच्याइतकीच प्रेमाची भुकेली आहे, साहेब! दररोज अशी काही वाक्ये बोलुन तर बघा

देव, तुला सुखी ठेव…. तुला खुप मिस करेन मी!…..तुझ्यावर माझा पुर्ण विश्वास आहे….. तुझ्याएवढं ह्या जगात मला कोणीही प्रिय नाही.

मी तुम्हाला खोटं खोटं प्रेम करा असं सांगत नाहीये, मी फक्त तुमच्या मनातल्या जिव्हाळ्याला तिच्यापर्यंत पोहोचवयला प्रोत्साहन देत आहे.

आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर हे जाहीरपणे सांगायला आपण एवढे नाखुश का असतो?

प्रेमपुर्ण आणि निरागस स्वभाव तुम्हाला निरोगी कामजीवनाकडे घेऊन जाईल.

स्त्री आधीन व्हायला जितकी कठीण आहे, तितकीच ती संबंध जोडायला उत्सुकही असते.

पण त्याआधी तिच्याशी मैत्रीपुर्ण आणि विलोभनीय संबंध तयार व्हावा लागतो.

सुखी वैवाहिक जीवनाचा नियम तिसरा – तुमच्या प्रेमसंबंधाविषयी बोलण्याचे धैर्य दाखवा.

४) प्यार का टच – करे सपनेको सच!

छोट्या छोट्या कृतीमधुन प्रेम व्यक्त केल्याने गाढ प्रेम निर्माण होते, जसे की –

तिने केलेल्या सेवेबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद द्या.

गुड मॉर्निंग किस तुमचा दिवस आनंदादायी, उर्जावान बनवेल.

वाढदिवस, एनिव्हर्सरी विशेष काहीतरी करुन साजरी केल्याने अविस्मरणीय बनते.

सकाळचा नाश्ता एकमेकांसोबत घ्या.

आठवड्यातुन एकदा फक्त दोघेच एकत्र जेवणासाठी बाहेर जा. मोबाईल स्वीच ऑफ करा आणि फक्त सहवासाची मजा लुटा.

एखाद्या रात्री मनातले सर्व कप्पे तिच्यापुढे रिते करा.

भेटवस्तु द्या.

कधी तिच्याशी उगीच छेडछाड करा. चोरटे स्पर्श, धसमुसळेपणा नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा जिवंत ठेवतो, नात्यांमध्ये गुलाबी रंगत आणतो.

प्रेमळ पणा हाच आपला स्वभाव बनवा! प्रेम करण्याच्या कृती आपोआप सुचत जातील.

सुखी वैवाहिक जीवनाचा चौथा नियम – प्रेम व्यक्त करण्याच्या कृती शिका!

हे होते सुखी वैवाहिक जीवनाचे चार नियम!

लेख आवडल्यास लाईक करा.

तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही प्रेम खुलवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरता, मला कमेंट बॉक्स मध्ये लिहुन कळवा.

तुमच्या लाईफ पार्टनरला ह्या ट्रिक्स कळवायच्या असतील तर नावासहित शेअर करा. म्हणजे टॅग करा.😍

आपल्या सर्वांचा गृहस्थाश्रम, आनंदी आणि सहजीवन तृप्त करणारा होवो, ह्या हृदयपूर्वक प्रार्थनेसह,

मनःपुर्वक आभार…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “सुखी वैवाहिक जीवन जगण्याचे चार नियम!”

  1. सर मला एक प्रश्न विचाराय चा आहे.
    माझ्या‌ लगनाला या मे 14 ला 4 वर्ष पूर्ण‌ होतील .एक 2.5 वर्षा च‌ मूल आहे.लग्ना नंतर बाळ होई पर्यंत सगळठीक होत .पण आता माझ्या अहोंना जरा ही वेळ नाही.म्हणजे सतत‌ कामातच असतात सकाळी ९ ला गेले तर रात्रीचं १० किंवा ११ ला घरी येतात .बिल्डर च‌ काम करतात .दिवसातून एकदा‌ फोन सुदंधा करत ‌नाही आल्यावर पण जास्त बोलत‌ नाही .आले तरी फोन मधेच असतात .हया सगल्या मुळे माझी खुप चिडचीड होते.मी खुप बोलते माझ्या अहोंना ते ऐकतात पण सगळ‌.पण माझी चिडचिड खूपच वाढले.मला ते समजतय‌ सगळ पण म मी काय‌ करू १,२‌दिवस कंट्रोल करते पण तीसऱ्या दिवशी ‌नाय ‌कंट्रोल होत खूप बोलते ‌मी ह्यांना पण मला ‌अस ‌वाटायला लागलय ‌की यांना कुटुंबा पेक्षा कामच महत्वाच आहे .फक्त बाबू आणि आम्ही २ असे ३ जण राहतो तरी पण‌ चिडचिड होते माझी खूप.सासू सासरे‌पण‌ खूप चांगले आहेत.कोणाच काहीच‌ टेंशन‌ नाही .सासू पण समजावतात यांना पण काहीच ‌फरक पडत नाही यांच्यात.यांच‌ पण तस काही टेंशन नाही कुठल व्यसन नाही काय‌नाय फक्त वेळच देत नाही. जराही नाही फक्त कामात व्यस्त असतात.काय‌ करू मी सर मला काहीच‌ सूचत नाही मी माोझी चिडचिड कशी ‌कंट्रोल करू सांगा ना प्लिज‌🙏🙏🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।