मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताना आपल्याला अंतर्मनाशी संवाद साधावा लागतो, स्व संमोहन करून.
माणसाला पाच ज्ञानेंद्रिये आहेत. त्या पाच ज्ञानेंद्रियांचा वापर करुन आपण अंतर्मनाला माहिती पुरवत असतो, जसं की आपण काल्पनिक पैशाला पाहतो, नोटांना स्पर्श करतो, नाण्यांचा आणि नोटांचा आवाज ऐकतो, करकरीत नोटांचा सुगंध घेतो!
ह्या पाच इंद्रियांचा वापर करुन आपण घर, कार यांचाही अनुभव घेतो, आणि आज ना उद्या ती गोष्ट प्रत्यक्षात मिळवतो.
ज्या प्रमाणे ह्या पाच इंद्रियांचा वापर करुन आपण स्वप्न आणि कल्पना पाहतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या पाच इंद्रियांना अनुभवहीन अवस्थेत नेऊन सुद्धा आपण कल्पना आणि स्वप्ने पुर्ण झाल्याचा प्रत्यय अंतर्मन जागृत करुन, स्पष्टपणे अनुभवु शकतो.
यालाच वेगळ्या भाषेत ‘स्व संमोहन’ असेही म्हणतात.
खुप सोपं आहे हे, तुम्हीही करा आणि तुमचे अनुभव सांगा.
स्व संमोहनः कसे करावे.
सर्वप्रथम एका आरामदायी अवस्थेत मांडी घालुन बसा, खोलीमध्ये एकांत असावा, खोली स्वच्छ असावी, धुप, अगरबत्ती यांचा वापर करुन सुगंधी वातावरण निर्मीती केल्यास आणि बॅकग्राउंडला मंद संगीत असल्यास खुप छान!
पोट खुप भरलेले नसावे आणि खुप भुक लागलेलीही नसावी. यासाठी सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ उत्तम!
आता डोळे बंद करुन एकेक अंक मोजत दिर्घ श्वास घ्या, एकेक श्वासासोबत एक ते दहापर्यंत आकडे मोजा. प्रत्येक श्वासासोबत अंग, शरीराचा प्रत्येक अवयव, अधिकाधिक रिलॅक्स, शिथील सोडा.
दहा दिर्घ श्वास झाल्यावर, आता संपुर्ण लक्ष उजव्या पायाकडे न्या आणि मनातल्या मनात सुचना द्या, माझा संपुर्ण उजवा पाय शिथील होत आहे, माझ्या उजव्या पायाच्या संवेदना नाहीशा होत आहेत.
अशी कल्पना करा की तुमचा उजवा पाय फ्रीज होत आहे. तुमचे उजव्या पायावरचे नियंत्रण राहीले नाही. जणु काही तो तुमच्यापासुन वेगळा होत आहे.
पाय संपुर्णपणे शिथील होईपर्यंत सुचना द्या……. “माझा उजवा पाय शिथील होत आहे, रिलॅक्स होत आहे.”
आता आकडे मोजा, एक, दोन, तीन – दहापर्यंत मोजुन पुन्हा एकदा सुचना द्या.
पाय ‘फ्रीज’ होईपर्यंत हा क्रम रिपीट करा. दहा पुर्ण झाल्यावर कल्पना करा की तुमचा पाय पुर्णपणे गोठलेला आहे.
तुमची ही सुचना थोड्या वेळात अंतर्मनला खरी वाटेल व थोड्याच उजवा पाय सुन्न होईल.
आता हीच कृती डाव्या पायासाठी करा. “माझा डावा पाय अधिकाधिक शिथील होत आहे, रिलॅक्स होत आहे.”
“माझं पोट, कंबर अतिशय शिथील होत आहे.”
“माझा छातीचा भाग, पाठ, खांदे अतिशय शिथील होत आहेत.”
एकेक इंद्रियाचा उल्लेख केल्यास त्याकडे संपुर्ण लक्ष घेऊन जा.
“माझी मान, गळा, चेहरा, हात, डोके सगळे काही शिथील, अधिकाधिक शिथील होत आहे.”
“माझे संपुर्ण शरीर शिथील झाले आहे.”
आता तुमचा पुर्ण शरीरावरचा ताबा सुटला असेल आणि फक्त आणि फक्त अंतर्मन जागृत असेल. ही अवस्था प्रचंड आनंददायी आणि उर्जावान असते.
वीस मिनीटांचे ध्यान तुम्हाला चार तासांची झोप घेऊन मिळणारा ताजेपणा प्रदान करते.
ह्यालाच अल्फा स्टेज असेही म्हणतात. इथे तुम्हाला स्वप्नांचे रोपण करावयाचे आहे.
“एक वर्षात माझ्याकडे सत्तर लाख रुपये आलेले आहेत.”
“मी माझ्या मालकीच्या खर्याखुर्या ड्रिमहाऊस आणि ड्रीमकार यांचा खरोखर अनुभव घेत आहे.”
“माझ्या आनंदी परीवारासोबत, आणि माझ्या प्रिय व्यक्तींसोबत मी माझ्या ड्रिम डेस्टीनेशनला भेट देत आहे.”
“मी आनंदी, प्रसन्न, आणि तृप्ततेचा आनंद घेत आहे, मला प्रचंड मानसिक शांती लाभत आहे. मी सर्वांवर प्रेम करतो, सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी सर्वांवर प्रेम करतो.
माझ्या प्रत्येक इच्छा पुर्ण होत आहेत, मला पुर्णतेची अनुभुती होत आहे.”
देवाच्या कृपेने, ही अवस्था झोपेपुर्वी आणि झोपेनंतर पाच मिनीटे दररोज प्रत्येकाच्या वाट्याला येते.
ध्यान, सुदर्शन क्रिया करुन, दोन तीन तास शरीर थकवणारं वर्क-आउट करुन, आवडत्या कामात झोकुन देऊन किंवा नवनवीन निसर्गरम्य ठिकाणी गेल्यासही या अवस्थेत सुलभपणे जाता येते.
मनःपुर्वक स्वागत आणि आभार!
वाचण्यासारखे आणखी काही…
गुंतागुंतीचे प्रश्न पण उत्तरं मात्र साधी…. (प्रेरणादायी लेख)
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.