स्वयंपाक घरातील टॉवेलवर असतात सगळयात जास्त बॅक्टेरिया, बॅक्टेरिया कमी करण्यासाठी आहेत काही सोपे उपाय
स्वयंपाकघर. एक अमाप उर्जेची जागा. जिथे छान छान पदार्थ तयार होत असतात. जे खाऊन मन तृप्त होतं. पण घरातल्या लहानमोठ्या व्यक्तींसाठी जिथे रूचकर अन्न तयार होत असतं ती जागा स्वच्छ निर्जंतुक हवी ना?
स्वयंपाक करताना मोठी गरम पातेली वगैरे उचलण्यासाठी, ताटंवाट्या पुसून घेण्यासाठी किंवा हात पुसण्यासाठी छोटे छोटे टॉवेल किंवा सुती कापडाचे तुकडे ठेवले जातात. हे सुती कापड किंवा टॉवेल वेळेच्या वेळी स्वच्छ धुतले नाहीत, तसेच पुन्हा पुन्हा वापरले तर त्यात बॅक्टेरियांचा शिरकाव होऊ शकतो. या बॅक्टेरियांमुळे काय होतं, की घरातल्या व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतात.
काही संशोधकांनी स्वयंपाकघरातल्या या बॅक्टेरियांवर संशोधन केलं. जेंव्हा स्वयंपाक आणि इतर कामासाठी वापरण्यात येणाऱ्या
टॉवेलवर जास्त बॅक्टेरियां आढळून आले तेंव्हा या संशोधकांनी सावधगिरीच्या सूचना दिल्या.
संशोधकांनी सांगितलं या टॉवेलचा किंवा सुती कापडाचा कशा पध्दतीने वापर केला जातो, याकडे लक्ष देणं जरूरीचं आहे. कारण टॉवेलवर ज्या बॅक्टेरियांची पैदास होते, त्यांच्यामुळे विषबाधा होऊ शकते.
शेकडो घरात जवळ जवळ महिनाभर स्वयंपाक घरातील टॉवेलवर संशोधन केलं गेलं. किती आणि कोणकोणत्या कामासाठी हे सुती कापड आणि टॉवेल वापरला जातो हे लक्षात घेऊन संशोधन केलं गेलं.
बॅक्टेरियां कसे पसरतात?
स्वयंपाकघरातल्या टॉवेलवर किंवा कापडावर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया सापडले.
या बॅक्टेरियांची संख्या आणि प्रकार घरातील सदस्यांनुसार कमी जास्त होत होती. यामध्ये कुटुंबातील सदस्य किती आहेत? मुलं किती आहेत? कशा पध्दतीचा स्वयंपाक केला जातो. यावर या बॅक्टेरियांची संख्या ठरत होती.
एका विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया, संशोधकांना अशा ठिकाणी सापडला जिथं कुटुंबात मुलं जास्त होती.
फक्त भांडी पुसायला किंवा फक्त हात पुसायला असणाऱ्या टॉवेलपेक्षा, वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टॉवेलवर जास्त बॅक्टेरिया सापडले.
भांडी कोरडी करण्याबरोबरच गरम भांडी उचलण्यासाठी, हात पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टॉवेलवर जास्त बॅक्टेरिया आढळून आले.
काही वेळा हे टॉवेल किंचित ओले होतात. ओलसरपणा असताना ही ते तसेच वापरले जातात. अशावेळी बॅक्टेरियांचा हल्ला जोरदार असणार यात शंकाच नाही.
बॅक्टेरियांचा आरोग्यावर हल्ला.
बॅक्टेरिया आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी हानिकारक ठरू शकतात. काही बॅक्टेरियांमुळे विषबाधा होऊ शकते. त्याच बरोबर अस्वस्थता, उलटी, लूज मोशन्स आणि तापासारखी लक्षणं दिसू लागतात. हा प्रभाव काही तासापासून काही दिवसांपर्यंत टिकू शकतो.
यावर उपाय काय?
नियमितपणे स्वयंपाकघरातील टॉवेलची स्वच्छता करणं हाच एक प्रभावी उपाय आहे. टॉवेल स्वच्छ धुवून, व्यवस्थित वाळवून मगच वापरावा. प्रत्येक कामासाठी वेगवेगळे टॉवेल ठेवले तरी बॅक्टेरियांचा प्रभाव खूप कमी होऊ शकतो. त्यासाठी एकाच रंगाचे टॉवेल न वापरता वेगवेगळ्या रंगाचे टॉवेल ठेवावेत, म्हणजे कुठला टॉवेल कोणत्या कामासाठी वापरायचा हे लक्षात राहू शकतं
बॅक्टेरियांचा नाश कसा करावा?
हात पुसण्यासाठी प्रत्येकाला वेगळा टॉवेल किंवा छोटा रुमाल द्यावा. स्वयंपाक घरातील टॉवेल फक्त ठराविक कामासाठी वापरावा. टॉवेलचे दोन सेट करावेत. ते दिवसाआड स्वच्छ धुवून घेतले तर स्वयंपाकघर रोगमुक्त होऊ शकतं. घरातील लहान मुलं जेष्ठ नागरिक यांच्या तब्येतीच्या तक्रारी पुर्ण पणे बंद करण्यासाठी स्वच्छ साफ टॉवेल वापरला पाहिजे.
पटकन लक्षात न येणाऱ्या बॅक्टेरियांमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकतं. योग्य स्वच्छता आपल्या परीवाराला सुदृढ व्हायला मदत करते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.