शत्रूला नामोहरम करणारा शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आपणही शिकला तर
बर्याचशा देशांमध्ये, एकाहुन एक रणनिती आखणारे, निर्भय, बेडर, शुरवीर आणि सरस असे सेनापती होऊन गेले! ज्युलियस सीझर, अलेक्झेंडर, नेपोलियन आणि अलिकडच्या काळात ग्लॅड्स्टन, चर्चिल, हिटलर, मुसोलिनी आणि अशा बर्याच जणांनी युद्धशास्त्राच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलयं! एक सेनानायक म्हणुन हे सगळे आपापल्या ठिकाणी महान आणि श्रेष्ठ आहेत. पण शिवाजी महाराजांसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.