विड्याचे पान, ताम्बूल – गुणधर्म आणि औषधी उपयोग
विड्याचे पान (ताम्बूल) आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. संपूर्ण भारतभर विड्याचे पान खाल्ले जाते. तसेच विड्याचे पान विविध प्रकारच्या पूजा करताना देखील वापरले जाते. विड्याचे पान शुभ मानले जाते. हे सारे तर आपल्याला माहीतच आहे, पण आपल्याला हे माहीत आहे का की विड्याच्या पानात खूप औषधी गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ते अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते. कसे ते आजच्या ह्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.