भारतातील पहिली महिला रिक्षा चालक असलेल्या परभणीच्या शिला डावरे यांची कहाणी
१८ व्या वर्षी १९८० च्या दशकात महाराष्ट्रातील परभणी येथे राहणारी एक तरुणी घरदार सोडून काहीतरी करणाच्या इच्छेने पुणे इकडे येते. हातात असलेले १२ रुपये आणि खूप सारी स्वप्नं…. थोडं शिक्षण झालं की कधी एकदा लग्न करून मुलीला सासरी पाठवतो असा विचार करणारे अनेक पालक असतात. असं गुलामगिरीचं जीवन नको म्हणून सगळ्यांना सोडून त्या काळात एका गरीब घरातील मुलीने स्वप्न बघितलं.