दुर्लक्षित भागात राहून तब्बल १८ शाळा सुरू करणारे – सुधांशू बिश्वास
१९१७ साली जन्मलेल्या सुधांशू बिश्वास ह्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध अतिशय लहान वयात आला. ब्रिटीश सरकार विरुद्ध चळवळीत भाग घेतल्याने ते ब्रिटीश सरकारच्या नजरेत आले. १९३९ साली मेट्रिक ची परीक्षा देत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांना ती परीक्षा देण्यापासून परावृत्त केलं. पुढे त्यांनी तीच परीक्षा पोलीस सुरक्षेत दिली.