त्याच्या नंतर
त्याचे अचानक जाणे हा जणू तिचाच दोष धरला गेला होता. सोनूलीला कुशीत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती. संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर जणू रिकामे उभे होते. अचानक डोअरबेलने ती जागी झाली. दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा दिर उभा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
त्याचे अचानक जाणे हा जणू तिचाच दोष धरला गेला होता. सोनूलीला कुशीत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती. संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर जणू रिकामे उभे होते. अचानक डोअरबेलने ती जागी झाली. दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा दिर उभा.
अंगणाला ‘अंगण’ न म्हणता तू ‘गार्डन’ म्हणायचास. माझ्या अंगणातल्या कमळाच्या छोट्या तलावाची हौस मी तुझ्या गार्डनमधल्या ‘स्विमिंग पूल’मध्ये भागवली होती. त्याबाजूला तू दोन खुर्च्या ठेवल्या होत्यास, झोपून बसल्यासारखं बसायला. तुला तिथे बसून राहायला आवडायचं आणि मला पूलमध्ये पाय टाकून.
मिसेस खन्ना वि़चारात मग्न असतानाच दाराची बेल वाजली. तिची समाधी भंग झाली. पण चेहर्यावर हलकासा आनंद दिसू लागला. तिने दार उघडले तर दारात मिस्टर खन्ना उभा होता. रोजच्याप्रमाणे तिने हसत त्याचे स्वागत केले. तो हॉलमध्ये सोफ्यावर बसला. तिने पाणी आणून दिले आणि त्याच्याकडे आशेने पाहू लागली.
तू हे काय चालवलं आहेस? शुद्धीत आहेस का तू? आजवर मधुराच्या वियोगात वेडा झाला होतास. आत्ता आत्ता कुठे थोडा सावरत आहेस. तर हे कुठलं नवीन खूळ डोक्यात घेतलं आहेस? हे मृगजळ आहे. भूत आहे हे मानवी वेशातलं. कोणतेही विचार, भावना नसलेली जीवरहीत बाहुली, एक अंगार आहे ही. हिला हिरा म्हणून धरायला जाशील तर नुसते हातच नाही तर सारं आयुष्य करपून जाईल. खर सांगू का? तर तू प्रेमात पडला आहेस तिच्या, तुझ्या ही नकळत.
आज च्या भेटीत जर त्याने आपल्या प्रेमाची कबूली दिली नाही तर आपणच स्वतः पुढाकार घेऊन त्याला आपला आजवरच्या अव्यक्त प्रेमाचा नजराणा पेश करायचा या अधीर निर्णयाप्रत ती आली होती. पण म्हणतात ना, अगदी मनाच्या अंतरंगापासून कुणी कसलीही इच्छा व्यक्त केली की ती पूरी होतेच होते. याची प्रचिती प्रिया ला आजच्या भेटीतच आली.
खरे तर कोणी ठरवलेल्या रंगाचे ड्रेस घालून जायची कल्पनाच तिला पटत नव्हती. आणि त्या त्या रंगाच्या साड्या आणि ड्रेस तिच्याकडे असतीलच याची खात्री नव्हती. तरीही सर्वांचा आग्रह म्हणून आजच्या कलरचा ड्रेस तिने घातला होता. नशीब आजच पगार झाला, म्हणून खरेदीसाठी मार्केट मध्ये आली होती. उद्याचा कलर कोणता हे पाहून त्या रंगाचा टॉप तिने घेतला. अचानक शेजारच्या दुकानातील फुटबॉलकडे तिचे लक्ष गेले.
मला फक्त मधुराने माझ्याकडे बघणं हवं होतं. ती बघे-पर्यंत मी कसलीच तमा न बाळगता तिच्याकडे बघत राहिलो, शेवटी गेलीच तिची नजर माझ्याकडे आणि मागासपासून अडवून धरलेल्या अश्रूंना जणू वाहून जायला अजून एक कारणच मिळालं. तिला अजून हिणवायला मी तिच्या नवऱ्याच्या दिशेने मान हलवत पूनमच्या हातात माझा हात गुंफला आणि दुसऱ्या हाताने तिला हात दाखवला.
रात्रीचे दोन वाजले होते. तो खाली उतरताच भुंकणारी कुत्री अचानक शांत झाली होती. तो हसला. च्यायला…. ह्यांना बरोबर कळते कोण सज्जन आणि कोण वाईट आहे ते. पण ती कुत्री लांब उभी राहून परत भुंकू लागली. हे जरा जास्त धोकादायक आहे असे मनात म्हणत त्याने हातात काठी घेतली. आजूबाजूला भयाण काळोख पसरला होता. इथेच झोपायचे की चालत जायचे याचा विचार करू लागला.
यांचं गाव कोकणात आणि गावाला घराण्याचे मूळ देव होते म्हणून नवऱ्याचे बहुतेक सगळे सण जसं कि होळी, दसरा, गणपती गावालाच साजरे व्हायचे. तिच्या नोकरीपायी तो तिला कधीच जबरदस्तीने माझ्या बरोबर आलंच पाहिजेस असं म्हणायचा नाही. पूर्वी म्हणजे लग्न नवीन असताना तो तिला आग्रह करायचा बरोबर चलण्यासाठी, पण तिच्यासाठी ते महाकठीण काम होतं
आज रक्षाबंधन होते तेव्हा नक्षलवाद्यांचा म्होरक्या माखन बहिणीला भेटायला येणार याची खबर तिला मिळाली होती आणि म्हणून आपल्या वीस साथीदारांसह रात्रीपासून त्याच्या वस्तीजवळ दबा धरून बसली होती.