गरोदर स्त्रिया कोरोनाची लस घेऊ शकतात का? जाणून घ्या सत्य
अनेक गरोदर महिला कोविडची लस घेण्यास देखील घाबरत आहेत. परंतु त्यामुळे त्यांना गरोदरपणात किंवा बाळंत होत असताना कोविड होणे, होणाऱ्या बाळाला कोविड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु २ जुलै पासून सरकारने गरोदर महिलांना कोविडची लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर मान्यता ही भारतीय लसीकरण परिषद आणि भारतीय स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचा विभाग ह्यांच्या सल्ल्याने देण्यात आली आहे.