जाणून घ्या जिज्ञासू लोकांच्या १० सवयी
लहान मुलांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी खूप कुतूहल असते आणि त्यामुळे ते सतत प्रश्न विचारत राहतात. खरं म्हणजे आपल्या सर्वांमध्येच जिज्ञासा असतेच. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण प्रश्न विचारेनासे होतो, आजूबाजूच्या वातावरणाला बुजतो आणि आपल्या मनातले कुतूहल दाबून ठेवतो.