माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)
कधीकधी व्यावहारीक जगात कितीही समजुतदार असल्या तरी दोन व्यक्ती एकमेकांना खटकु लागतात, तेव्हा दुर होणं, आपली वेगळी वाट निवडणं, अपरीहार्य ठरतं, पण म्हणुन सगळे संबंध तोडूनच वेगळं व्हावं, असही नसतं, हसत खेळत, केलेल्या उपकाराची जाण ठेवुन, आभार मानत, वेगळं होता येतं! न पटणार्या गोष्टी आठवुन, कडाक्याचं भांडण करण्यापेक्षा, जुळणार्या गोष्टी आठवुन मैत्रीचा सोहळा करत, वेगळं होणं, कधीही चांगलं!..