पडद्या ‘मागचं’ राजकारण
चित्रपटसृष्टीमधे सध्या चरित्रपटाची लाट आली आहे. हिंदी असो, मराठी असो कि दाक्षिणात्य फिल्म इंडिस्ट्री असो सगळीकडे ‘बायोपिक’ची धूम सुरु आहे. एकदा प्रयोग रसिकांच्या पसंतीला उतरला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याचे फलित समोर आले तर त्या प्रकारचे सिनेमे बनविण्याचा एक ट्रेंडच दिसायला लागतो.