पायावरून गेलेल्या रेल्वेला हरवून जिंकलेली अरुणिमा सिन्हा
तिला कोणाची दया नको होती. सहानभूती ने बघणारे डोळे नको होते तर जिद्दीने सन्मान करणारा आणि एक सामान्य स्त्री ला मिळणारा मान हवा होता. प्रवास सोप्पा नव्हता पण अरुणिमाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हता. नेहरू इन्स्टीट्युट ऑफ माउंटेनिअरिंग मधून उंच शिखर पार करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण तिने घेतलं.