भविष्यात अवकाशात वस्ती करण्याची गरज का पडणार आहे?
आपलं विश्व हे अनेक गूढ, स्तिमित करणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. ज्यात असंख्य ग्रह, तारे, धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह असं सगळचं सामावलेलं आहे. ह्यातील अनेक ग्रह, लघुग्रह ह्यावर मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण नसलं तरी त्यावर असलेल्या वातावरणात, मूलद्रव्यात माणसाच्या मुलभूत गरजांना भागवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच येत्या काळात अवकाश हेच आपलं भविष्य राहणार आहे.