अवकाश सफारीचं नवीन वाहन ‘स्पेस एक्स ड्रॅगन’..
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यावर, अवकाश हे आपली तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे मांडण्याचं एक स्थान झालं. त्यामुळे अवकाश, पुन्हा तिथे जाण्यासाठी जगातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या देशांना खुणावू लागलं. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्यामागे अमेरिकेचा ‘स्पेस प्रोग्रॅम’ कारणीभूत होता.