मॅराडोनाच्या खेळाला उतरती कळा केव्हा आणि का लागली?
१९८६ चा वर्ल्ड कप माराडोनाला दैवत्व देऊन गेला. वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिनाचा सामना संस्मरणीय ठरला तो माराडोना च्या दोन गोलमुळे. ह्या स्पर्धेला इंग्लंड आणि अर्जेंटिना मध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे एकमकांचे उट्टे काढण्याचा चंग दोन्ही संघांनी बांधला होता. पहिल्या गोलच्या वेळी माराडोना च्या हाताला लागून फुटबॉल इंग्लंडच्या जाळ्यात शिरला.