कित्येक अपयशं पचवून शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचलेला इलॉन मस्क!!
कुठल्याही अडथळ्याला न जुमानता दूरदृष्टी ठेऊन भविष्याचा विचार करणारे ‘बिजनेस मॅग्नेट’ हा इलॉन चा थोडक्यात परिचय म्हणता येईल. लहानपणीच म्हणजे १० वर्षांपर्यंतच्या वयात इलॉन ने एवढी पुस्तकं वाचली होती जेवढी एका साधारण ग्रॅज्युएट ने सुद्धा क्वचितच वाचली असतील. १२ वर्षांचा असतानाच इलॉनने एक कम्प्युटर गेम बनवला आणि एका ऑनलाईन कम्पनीला तो गेम ५०० डॉलर मध्ये विकला.