भारतातल्या पहिल्या महिला वकील असलेल्या नाशिकच्या कार्नेलिया सोराबजी
स्त्रियांना कोणी वाली नाही अशी समाजाची स्थिती असताना या स्त्रियांसाठी ती देवदूतासारखी होती. या काळात आपल्या समाजात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. अश्या स्त्रियांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय कार्नेलियाने घेतला.