रॉबर्ट मॅनरी – स्वप्नांच्या सफारीवरचा खराखुरा खलाशी ! एक प्रेरणादायी कहाणी
त्या दिवशी एक वेगळ्याच प्रकारची छोटीशी, पिटुकली, बोट फालमाऊथ ह्या ठिकाणी मॅसुच्युसेटस समुद्रकिनार्यावरुन इतर महाकाय बोटींच्या ताफ्यातुन निसटली आणि मोकळ्या समुद्रात घुसली. त्या बोटीवर रॉबर्ट मॅनरी हा एकटाच होता. कोण होता हा रॉबर्ट मॅनरी? आणि आपली लाकडाची रंगबेरंगी, पण विलक्षण देखणी बोट घेऊन तो कोणत्या प्रवासावर निघाला होता?