करून बघा रोजच्या जगण्यात इच्छाशक्ती आणि कष्टांची गुंतवणूक!!
एखादी गोष्ट मिळवायची इच्छा असेल आणि त्याच्या जोडीने जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळते. खरेतर हे साधे, सरळ आणि सोपे गणित आहे, पण मग तरी असे का होते की आयुष्यात काही इच्छा पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात? एखाद्या संध्याकाळी तुम्ही एकटे असाल किंवा आयुष्याबद्दल तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी चर्चा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्यासाठी तुम्ही कारणे शोधत बसता.