कृष्णविवर म्हणजे काय? याची रोचक माहिती वाचा या लेखात.
जगाच्या कोपऱ्यात कुठेही आपण वावरतो तेव्हा एक गोष्ट जवळपास सारखी असते ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. समजा आपण एखाद्या रस्त्यावरचं म्हणजे मुंबईतल्या एस.व्ही रोड किंवा पुण्यामधल्या डेक्कन वरचं गुरुत्वाकर्षण नाहीसं केलं तर? जे लोक आधीच कोणत्याही मोशन म्हणजे वेगात आहेत ते अवकाशात फेकले जातील.