उंबरठा! – आठवण स्मिता पाटीलची
एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली कि स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण रामायणापासून पाहतोच आहोत कि. अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबी सुद्धा करू शकतो, करतोच. स्त्रीने तिच्या घराचा, समाजाच्या बंधनाचा, रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं कि उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते. पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनाला हि पडलेला आहे. तो ओलांडणं हे किती अवघड आहे.