या लेखात वाचा अपेंडिक्सच्या तीव्र वेदना टाळण्यासाठी काय करावे?
पोटात उजव्या बाजूला खाली अगदी तीव्र वेदना होतात त्याला अपेंडिक्स असे म्हणतात. अपेंडिक्स (म्हणजेच आंत्रपुच्छ) ला आलेल्या सूजेमुळे हा त्रास होतो. अपेंडिक्स ही एक मेडिकल एमर्जन्सि असणारी परिस्थिति आहे. त्वरित लक्षणे ओळखून उपचार केले नाहीत, दुर्लक्ष झाले तर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. जीवाला देखील धोका असतो. अपेंडिक्सचे हे दुखणे अचानक उद्भवलेले (अक्यूट) किंवा आधीपासून त्रास असलेले (क्रॉनिक) असू शकते.