१५०/- रूपये पगार ते १००० कोटींचा व्यवसाय असा वेगळा आलेख मांडणारा अवलिया
सध्या तरूण वर्गाला नाना प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी उद्योग करण्याचं वय आहे, पण संधी नाही. अर्थार्जन होत असेल तर पुरेसं नाही. काम मिळालच तर ते टिकवता येईल याची शाश्वती नाही. दिवसेंदिवस जबाबदारीचा डोंगर मात्र वाढतोय. पण अशा वेळी खचून जाऊन कसं चालेल??