ती आणि राखी

ती आणि राखी

आज चांगलाच मूड बनवून त्याची पावले तिकडे वळली. नवीन पाखरू आल्याची साखरबातमी त्यालाही कळली होतीच. तिला बघायला, स्पर्शायला तो आतुर झाला होता. नेहमीप्रमाणे ऍडव्हान्स देऊन तो तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. तेवढ्यात कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाजाने दार उघडले तसे त्याचे डोळे चमकले.

सावज

सावज

“ येऊ का? ”…… पांडूने सगळा धीर गोळा करून “ये” असं उत्तर दिलं आणि त्याला जमिनीच्या खाली कसलीतरी हालचाल जाणवली. जमिनीच्या खालून काहीतरी त्याच्याकडे आलं होतं. पांडू घराच्या बाहेर आला ती हालचाल त्याला जाणवत होती. काहीतरी जमिनीखालून त्याच्या मागे येत होतं. तो झपझप पावलं टाकत घराकडे निघाला. ती जमिनीखालची सळसळ त्याला घाबरवत होती. त्याने अंगात घातलेला शर्ट घामाने पूर्ण भिजला होता, हातपाय कापत होते.

Psycho- लिझा…. नाही, नाही!! शर्मिला…….

psycho

मी लिझा आणि आमची छोटुकली एली, मस्त जीवन होतं एकंदरीत, लिझा अजूनही लोळत पडली होती बेडमध्ये, रात्री जरा जास्तच वाईन घेतली असावी तिने, खूप अवखळ झाली होती रात्रभर झोपू दिलं नाही लिझाने मला, एका फर्म मध्ये मी उच्चपदावर काम करत असल्याने पैसा बक्कळ येत होता घरात कसलीही कमतरता नव्हती…. मी बसलो गार्डन मध्ये, सकाळी सिगरेट ओढलेली लिझा ला आवडायची नाही, ती झोपली होती म्हणून चान्स घेतला, मस्त दोन झुरके मारल्यावर छान वाटलं, रिलॅक्स वाटलं एकदम.

जनाआजी……

Janaaji

कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या आपल्या बहिणीला त्याने फोन केला तेव्हा तीही म्हणाली “अरे असे कसे अचानक झाले ….?? तुला आधी कळवता येत नाही का…. ?? लक्ष कुठे असते तुझे आईकडे ..?? काहीतरी लक्षणे आधी दिसत असतील ना ..?? मला किती त्रास होईल आता येताना. काही घडले तर माझ्यासाठी खोळंबून राहू नका ह्यांच्या मीटिंग आहेत, आणि मलाही सुट्टी मिळणार नाही. आम्ही आताच सुट्टी घेऊन अमेरिका फिरून आलो. काळजी घे आईची “, असे म्हणून फोन ठेवला.

गण्याची युक्ती…..

manache-talks

काल तर भाजी आणताना एका बाईन दुसऱ्या बाईला हा गंगीचा नवरा म्हणून माझी वळख करून दिली. आता तूच इचार कर मी जर पॉश नाही राहिलो तर तुला खाली मान घालावी लागलं का न्हाय? गण्याच्या या प्रश्नाने गंगी काय समजायचं ते समजली. ती काय बी बोलली नाय. तिला गण्याचं लक्षण मात्र ठीक दिसलं नाय.
त्यातच एक दिस शेजारची कमळी तिच्या घरी आली.

वारी…..

wari

“चल आता आपण नाश्ता करू ….. मी तुझ्यासाठी पास्ता करते.. असे म्हणतात आजीने खट्याळपणे डोळे मिचकावून होकार दिला. तिनेही आपल्या पद्धतीचा पास्ता बनवून आजीला भरविला. आजीने तिला पेपर वाचून दाखवायची खूण केली. हिला बऱ्याच वर्षांनी पेपर वाचायची संधी मिळाली. अडखळत का होईना तिने महत्वाच्या बातम्या आजीला वाचून दाखविल्या मग तिला औषधें देऊन स्वतःची तयारी करायला गेली. बाहेर आली तेव्हा आजी शांतपणे झोपली होती.

उपाय

manachetalks

“अगं….आता नको .. बाहेरच झालेय. मित्रांबरोबर बसलेलो. नाही म्हणता आले नाही. गप्पागोष्टीत तुला कळवायचे राहून गेले. तिने काही न बोलता जेवण तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि बेडरूममध्ये निघून गेली. थोड्यावेळाने फ्रेश होऊन तो आत आला. तिला जवळ घेतले.

दैव

daiv-marathi-story-ktha

अंतुकाका आपली गाडी स्टार्ट करून भीमाच्या घरी जायला निघाले. हे काम सुद्धा आता रामाला मिळणार हे त्यांच्या बोलण्यातून भीमाला समजले होते.  हळूहळू त्याची शुध्द हरपू लागली. ती पायातून जाणाऱ्या रक्तामुळे होती की मुलांच्या शाळेच्या चिंतेने ते मात्र त्याला समजत नव्हते.

मार्ग… (मराठी कथा)

Marathi story

एका मिनिटानी दार उघडून जमिनीवरची वडी उचलून “तुझ्याशिवाय कसं होणार माझं?” असं पुटपुटत दार लावून अंघोळ करायला गेले. स्वयंपाकघरात दादांनी केलेल्या पोह्यांची चव घेऊन आणलेला नाश्ता परत बॅगेत ठेऊन मी आपला गेलो तसा गप निघून आलो.

कांदेपोहे

कांदेपोहे

“त्याचं काय आहे न आमची पल्लू चांगल्या नोकरीला लागलेली मुंबईला पण तिला मुंबई मानवेना सारखी आजारी पडायला लागली, मग मीच म्हणले मरो ती नोकरी तू ये घरी. आता इथेच एका लहानशा कंपनीमध्ये जाते ती कामाला, लग्नानंतर पुण्यात मिळेलच ना चांगली नोकरी तिला ”

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।