पहिले महायुद्ध! (प्रशियन युद्ध ते राणी विक्टोरियाचा इंग्लिश द्वेष्टा नातू कैसर विल्हेल्म दुसरा)
मात्र ह्या जर्मनीचा एक मोठा प्रोब्लेम होता. अक्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. वर्गात मध्येच नवीनच दाखला घेतलेल्या हुशार मुलाकडे जसे सगळे संशयाने पाहतात आणि सुरुवातीला त्याला सवंगडी मिळायला त्रास होतो तो एकटा पडतो तसे त्याचे झाले होते. पश्चिमेला असलेला फ्रांस तर त्याचा आधी पासूनचा वैरी.