पॅरालिसिस किंवा अर्धांगवायूच्या रुग्णांचा आहार कसा असावा
पक्षाघात किंवा अर्धांगवायू, पॅरालिसिस ज्याला बोलीभाषेत लकवा असे देखील म्हटले जाते हा एक गंभीर आजार आहे. ह्या आजारात शरीराचा अर्धा भाग (संपूर्ण डावी बाजू किंवा संपूर्ण उजवी बाजू) बाधित होतो. शरीराच्या अर्ध्या भागाच्या संवेदना नष्ट होतात आणि त्या भागाची हालचाल देखील रुग्णाला करता येत नाही. तसेच शरीराचा जो भाग बाधित झाला असेल त्या बाजूला चेहरा, ओठ वगैरे वाकडे होणे, त्या बाजूचा हात, पाय शक्तिहीन, लुळा होणे असे परिणाम दिसून येतात.