लोक खोटं का बोलतात? वाचा या लेखात
लोक खोटं का बोलतात ह्याची असंख्य कारणे आहेत. इतकी कारणं आहेत की त्या सर्वांची नोंद करणे देखील अवघड ठरेल परंतु आपण त्यापैकी काही नेहेमीची कारणे पाहूया ज्यामुळे लोक खोटं बोलायला प्रवृत्त होतात. सर्वात महत्वाचे कारण असते ते म्हणजे शिक्षेपासून बचाव. लहान मुले आणि मोठे ह्या सर्वांना खोटे बोलायला उद्युक्त करणारे हे प्रमुख कारण. ह्याशिवाय इतरही कारणे आहेत ती म्हणजे आपला व इतरांचा कोणत्याही धोक्यापासून बचाव, एखाद्या गोष्टीबाबत गोपनीयता सांभाळणे, किंवा एखाद्या गोष्टीमुळे चारचौघांत लाज वाटणे टाळण्यासाठी. आज आपण लोकांची खोटे बोलण्याची कारणे विस्ताराने पाहूया.