दैनंदिन वेळापत्रक गरजेचं का आहे आणि ते तंतोतंत पाळण्याची सवय लावण्याचे तंत्र!
निसर्गाने प्रत्येकाला अगदी एकसारखा वेळ दिलेला आहे. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळालेले असतात. पण या चोवीस तासात कुणी कामाचे डोंगर उपसूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढू शकतात. तर काही जणांना थोडीशी कामं करायलासुद्धा हे चोवीस तास ही अपुरे पडतात. असं का होत असेल ?