एखाद्या ऑपरेशन नंतर पडलेल्या टाक्यांचे जुने निशाण हि सर्वांचीच एक ठरलेली समस्या असते. हे टाके शरीराच्या दर्शनी भागावर असतील तर मग, मात्र ते लपवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो.
म्हणूनच हे टाके घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून किंवा त्वचारोग तज्ञांच्या मदतीने काय करावे ते वाचा या लेखात.
कधी काही दुखापत झाली किंवा ऍक्सिडंट किंवा दुसऱ्या एखाद्या कारणाने ऑपरेशन झाले की मग टाके घातले जातात.
त्या वेळी टाके सुकण्यासाठी बरीच काळजी आपण घेतो. काही दिवस जखमेवर पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
जखम चिघळणार नाही, यासाठी खाण्यात पथ्य सुद्धा पाळावे लागतात.
प्रत्येकाच्या शरीराचा जखम बरी होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. त्यानुसार टाके सुकतात आणि ते टाके काढले जातात.
पण हे टाके पडल्याचे निशाण मात्र तसेच राहतात.
हे निशाण जर चेहरा किंवा त्वचेच्या दर्शनी भागावर असतील तर ते लपवण्याकडेच आपला कल असतो.
या लेखात टाक्यांचे निशाण घालवण्याचे काही उपाय आपण बघू.
१) काकडी, पुदिना, लिंबू आणि अंड्याच्या योक चा वापर:
साहित्य: १) बिया काढलेला काकडीचा गर
२) पुदिन्याची पाने
३) अर्ध्या लिंबाचा रस
४) एक अंडे
मिश्रण बनवण्याची कृती: १) बिया काढलेला काकडीचा गर, पुदिन्याची पानं आणि अर्ध्या लिंबाचा रस मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
२) या मिश्रणात एका अंड्याचा पिवळा भाग मिसळून मिश्रण नीट एकजीव करून घ्या
हे मिश्रण टाके पडल्याच्या जुन्या डागावर नियमितपणे लावावे. डाग जाण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.
२) टाक्यांचे डाग घालवण्यासाठी मधाचा वापर:
साहित्य: १) अर्धा चमचा मध
२) अर्धा चमचा बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आणि मध यांचे मिश्रण ४ ते ५ मिनिट टाक्यांच्या जीर्ण डागावर मसाज करत लावावे, आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.
३) कांद्याचा रस:
कांद्याचा मिक्सर मध्ये बारीक करून रस किंवा ज्यूस तयार करून तो जीर्ण टाक्यांवर लावून दहा मिनिटं ठेवावा आणि नंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. हे नियमितपणे काही दिवस करणे गरजेचे आहे. टाके घालवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांना काही वेळ देणे गरजेचे आहे. याचा परिणाम झटपट दिसणार नाही.
४) हळद आणि दूध:
हळद आणि दुधाचे मिश्रण टाक्यांच्या जुन्या डागावर नियमितपणे स्क्रबर सारखे मसाज करून लावावे.
५) कोरफडीच्या गराचा वापर:
कोरफड चा गर काढून त्यात व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘इ’ चे कॅप्सूल मधील जेल मिक्स करून ते मिश्रण जीर्ण टाक्यांच्या भागावर लावावे.
टाक्यांचे डाग घालवण्याचे इतर काही प्रकार:
१) टाके पूर्णपणे बरे झाल्यावर टाक्यांच्या भागावर नियमितपणे मसाज करणे गरजेचे आहे. रक्ताभिसरण नीट होऊन अशा प्रकारे केले जाणारे उपाय प्रभावी ठरू शकतात.
२) टाके पूर्ण पणे बरे झाल्या नंतर dermatologist च्या सल्ल्याने आठवडयातून दोन वेळा एक्सफोलिएशन म्हणजेच डेड स्किन घालवण्याची प्रक्रिया करावी.
३) टाक्यांचे डाग घालवण्यासाठी डर्मीटोलॉजिस्ट कडून डर्माब्रेशन बद्दल माहिती घेऊन ही प्रक्रिया सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. यात एका उपकरणाच्या साहाय्याने त्वचेचा वरचा लेअर साफ केला जातो.
४) याशिवाय लेजर ट्रीटमेंट सुद्धा केली जाते. पण या ट्रीटमेंट त्वचा रोग तज्ञांच्या सल्ल्यानेच कराव्यात.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Majh potach operation zhalya mule take pdle ahe tr te takeynchy daag Kase durr karave