आपली बुद्धी ‘पूर्णपणे’ वापरण्याचे तीन नियम (प्रेरणादायी लेख)

आपलं डोकं हे एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मशीन आहे. पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना याच्या अफाट शक्तीची कल्पनाच नसते.

आपल्याकडे भूतकाळात डोकावून विचार करायची शक्ती आहे ज्याने आपण अनुभवातून शहाणं होऊन येणाऱ्या अडचणींना टाळू शकू. शिवाय आपल्याकडे भविष्याचा विचार करण्याची कुवत आहे म्हणजे आपण येऊ शकणाऱ्या अडचणींना हेरून त्या अडचणी येऊ नये म्हणून काही तजवीज करू शकू.

आणि यात तसं काही रॉकेट सायन्स सुद्धा नाही. अगदी अशिक्षित माणसापासून ते यशस्वी, इंटलेक्च्युअल माणूस सुद्धा आपल्या क्षमतेसुसार हे करत असतो.

‘क्षमता’ हीच ती गोष्ट आहे जी ठरवते आपण कसं आयुष्य जगणार. यशस्वी, इंटलेक्च्युअल, श्रीमंत बनून जगणार कि सामान्यपणे घड्याळाच्या काट्यावर चालणारं आयुष्य जगणार.

आज आपण आपल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करण्याच्या तीन नियमांबद्दल बोलू. यात आपण हे हि बघू कि क्रिएटिव्हिटी नक्की काय असते? आणि तुम्हाला आपल्यातली सुप्त क्रिएटिव्हिटी कशी जागी करता येईल.

पहिला नियम “विश्वास”

जोपर्यंत तुम्हाला मनोमन विश्वास होणार नाही कि, ‘हे काम मला जमणारंच आहे तोपर्यंत तुमची बुद्धी ते काम करण्याचे रस्ते चाचपणारच नाही. त्या कामात येणाऱ्या अडचणी आणि त्या कामामुळे मिळणारं समाधान याबद्दल विचार करणारच नाही.

उदाहरणच पाहायचं झालं तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी जर या गोष्टीवर विश्वास नसता ठेवला कि एखादं असं काही यंत्र बनवता येईल ज्याने लांब-लांब राहणारे लोक एकमेकांबरोबर बोलू शकतील तर त्यांनी कधीच टेलिफोन बनवला नसता. तसंच जर तुम्ही विश्वासच नाही ठेवला कि, जी काही तुमची योजना असेल (काही का असेना, सक्सेसफुल बिजनेस, नोकरीत प्रमोशन किंवा आणखी काही) ती पूर्ण करणं तुम्हाला शक्य आहे. तर पुढचे विचार तुमच्या मनाला शिवणार सुद्धा नाहीत. म्हणून आधी विश्वास ठेवा कि ‘हो मी हे करणारच…’ ‘Yes I Can…’ मग बघा कशी ऊर्जा तुमच्यात संचारेल.

आता हि ‘Yes I Can’ वाली, जर तुम्हाला नुसतीच मोटिव्हेशनची गोळी वाटत असेल तर बघा. जर तुम्हाला काही बिजनेस करावासा वाटत असेल. पण मी हे करू शकेल असंच जर तुम्हाला विश्वासाने वाटत नसेल तर तुम्ही कशाला असा काही विचार कराल कि, बिजनेसचं काय नाव असलं तर त्याची ओळख लोकांना सहज पटेल, त्याचा लोगो काय ठेवायचा, आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कोणकोणत्या लोकांना उपयोगी पडू शकेल.

हे सगळे विचार करण्याच्या आधीच ‘हे काही माझ्याच्याने होणारं नाही’ असा विचार करून आजपर्यंत अशी बरीच स्वप्नं तुम्ही अडगळीत टाकली असतील बरोबर ना!! जे आपल्याला शक्य वाटतं, विश्वास वाटतो तेच विचार आपण करतो.

आता पुढचा प्रश्न असा कि ‘विश्वास कसा ठेवायचा?’

मोठ्या कामाची सुरुवात करण्यासाठी इतके छोटे गोल ठेवा ज्याने तुम्हाला १००% विश्वास असेल कि हे तुम्ही करू शकाल. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एका यु ट्युबर महिलेचं हे उदाहरण. घरातलं काम नीटनेटकं करून नंतर टीव्ही बघणं, झोपणं आणि मोबाईलवर वेळ घालवणं असा तिचा दिनक्रम होता. स्वयंपाक मात्र तिला झकास जमायचा. तिला आपलं नेहमी वाटायचं कि आपलं जर यु ट्यूब वर कुकिंगचं मोठं चॅनल होऊन आपण फेमस झालो तर…. पण त्यानंतर हे काही आपल्याकडून होणारं काम नाही म्हणून तीने बरेचदा हा विचार तिथेच सोडूनहि दिला होता.

पण एक वेळ अशी आली, तिने आधी विश्वास ठेवला कि… हे तर मी करू शकेल…

पुढे घरातच सध्या मोबाईलवर कोणाच्या तरी मदतीने पहिला व्हिडीओ बनवून तो उपलोड केला एका व्हिडिओत साहजिकच खूप दर्शक नाहीच आले. पण पाहिलं छोटं उद्दिष्ठ पूर्ण झाल्याचं समाधान तिच्यातला आत्मविश्वास वाढवायला भरपूर झालं.

पुढे हळूहळू १०० सबस्क्रायबर्स मिळवणं, १००० सबस्क्रायबर्स मिळवणं अशी छोटी छोटी उद्दिष्ठ पूर्ण करत आज या बाईंना यु ट्यूब कडून त्यांचं स्टार यु ट्युबर्स ला दिलं जाणारं गोल्ड बटन मिळालेलं आहे. हे करताना नक्कीच त्यांना बऱ्याच अडचणी आल्या असतील. पण जेव्हा आपण एखाद्या ध्येयाकडे नजर ठेऊन वाटचाल करतो तेव्हा आपली बुद्धी, आपला मेंदू येणाऱ्या अडचणींच निराकरण करण्यासाठी तयार असतो. आणि छोटी छोटी ध्येयपूर्ती झाली तर मोठ्या यशाकडे पोहोचणे सोपे असते.

दुसरा नियम “माहिती मिळवणं”

आपल्याला माहिती असल्याशिवाय आपला मेंदू योग्य दिशेने काम करू शकत नाही. जेवढी जास्त माहिती तुम्ही घ्याल तेवढा तुमचा मेंदू ठरवलेल्या कामासाठी फोकस्ड राहील.

आता एक साधा प्रश्न? क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? मनाचेTalks च्या फेसबुक पेजवरील #LetUsTalk मध्ये अलीकडेच आपण हा प्रश्न विचारला होता. (#LetUsTalk मध्ये लेखातील विषयांबद्दल चर्चेसाठी आपण काही विषय बोलतो. हवं तर याला थॉट डायरी म्हणू) यात वाचकांची बरीच छान छान उत्तरं आली जसं स्वतःची क्षमता, निर्मिती, कल्पना वगैरे.

आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल तर त्या माहितीला एकत्र करून आपण काहीतरी नवीन बनवतो हि झाली क्रिएटिव्हिटी. जर तुम्हाला काही बिजनेस करायचा असेल तर त्या बिजनेसबद्दल, वेगवेगळी पुस्तकं, इंटरनेटवरची माहिती, मार्केटमधली त्या बिजनेसची स्थिती याची माहिती घेतली तर आपला मेंदू त्या दिशेने लक्ष केंद्रित करेल.

आपला जो गोल असेल त्या गोलबद्दल पूर्ण माहिती घ्या. म्हणजे ज्या अडचणी तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात बाधा आणतात त्या अडचणींचा सामना करण्यासाठी तुमची बुद्धी तयार असेल.

तिसरा नियम “योग्य माहिती मिळवणं”

तुम्ही माहिती घेत असताना त्या माहिती मध्ये सुसूत्रता असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयाच्या व्यतिरिक्त माहिती घेता तेव्हा त्या अनुषंगाने असलेली इतर माहिती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करायला पुरेशी ठरू शकते.

तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थी असाल, नाहीतर व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर हे अगदी छोटे छोटे तीन नियम वापरून आपली उद्दिष्ट पूर्ण करणं सहज शक्य होईल. खरंतर या गोष्टी खूप सध्या असतात पण रोजच्या जीवनात त्याचा वापर करणं ‘यात काय विशेष’ म्हणून राहून जातो.

आणि ‘यात विशेष काय!!’ हेच तर सांगण्यासाठी आहे मनाचेTalks

तर अशाच काही छोट्या छोट्या टिप्स तुम्ही पण आम्लात आंत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच आणखी काय विषय तुम्हाला चर्चा करण्यासाठी आवडतील तेही कमेंट्स मध्ये लिहा.

शुभेच्छा आणि धन्यवाद 👍

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “आपली बुद्धी ‘पूर्णपणे’ वापरण्याचे तीन नियम (प्रेरणादायी लेख)”

  1. All the articles are very inspiring helping us to overcome the negativity, anxiety and depression.
    Hope this bacon light will guide us forever.
    Thank you

    Reply
  2. खूपच छान….आपल्या अंगातील pastion कसे शोधायचे याच्यावर एक लेख लिहाना plz

    Reply
  3. खुप छान प्रेरणादायी आहे.
    आपल्यातील चांगले गुण कसे ओळखायचे यावर लेख plz.
    स्वताः ला स्वताः शी कसे बोलते करावे.
    आत्मचिंतन कसे करावे व ते वाढवावे या विषयावर लेख plz.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।